Uddhav Thackeray, Sonia Gandhi, Mamata Banerjee | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आज (बुधवार, 26 ऑगस्ट) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यासह काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक घेणार आहेत. या बैठकीत कोरोना व्हायरस, लॉकडाऊन, अर्थव्यवस्था आणि जीएसटी (GST) अशा विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. यासोबत नीट (NEET Exam) आणि जेईई परीक्षा (JEE Exam) आदी मुद्द्यांवरही या बैठकीत चर्चा होणार आहे.

काँग्रेस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बैठ व्हिडिओ काँन्फरन्सींगद्वारे पार पडणार आहे. या बैठकीस पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, पुड्डूचेरीचे मुख्यमंत्री वी. नारायणसामी यांचीही उपस्थिती असणार आहे.

जीएसटी परिषदेची एक बैठक गुरुवारी (27 ऑगस्ट) पार पडत आहे. या बैठकीच्या एक दिवस आगोदर सोनिया गांधी आणि मुख्यमंत्र्यांची ही बैठक पार पडत आहे. त्यामुळे या बैठकीस विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. काँग्रेस सूत्रांनी दिलेल्या माहतीनुसार काँरोना व्हायरस संसर्गाची भीती असताना परीक्षा स्थगित करण्यात याव्यात यासठी केंद्र सरकारवर दबाव टाकण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. त्यामुळे या विषयांवरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, JEE (Main), NEET 2020 Exam Date and Schedule: जेईई (मुख्य) परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर दरम्यान, तर नीट (युजी) ची परीक्षा 13 सप्टेंबर रोजी आयोजित; NTA कडून परिपत्रक जारी)

कोरोना व्हायरस संकटामुळे देशभरातील विविध राज्यांचा महसूल बुडाला आहे. परिणामी राज्य सरकारांसमोर आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. अशा अवस्थेत राज्यांना केंद्र सरकारकडून आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. जीएसटी परतावा आणि इतर मदत यावरही या बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजते.