भारतीय सेना (Photo Credits: IANS)

जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir) च्या शोपियान (Shopian) मध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दल यांच्यात आज सकाळी झालेल्या भीषण चकमकीत चार दहशतवादी ठार झाले आहेत. दक्षिण काश्मीरच्या दारमदोरा (Daramadora) परिसरात ही चकमक झाली. दहशतवाद्यांच्या खात्म्यानंतर सुद्धा या ठिकाणी सुरक्षा दलाची शोधमोहीम सुरूच आहे .कीगम (Keegam) परिसरात सुरक्षा दलाची शोध मोहीम सुरु असताना काही दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता याचे उत्तर देत आज सकाळी त्यांना यमसदनी धाडण्याचा पराक्रम करण्यात आला आहे. मृत दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.

ANI ट्विट

प्राप्त माहितीनुसार, सुरक्षा दलांनी आज सकाळी कीगम परिसरातील दहशतवाद्यांचा ताल आज सुरक्षा दलाने उडवून लावला. साक्ली आठ पर्यंत यातील 2 जणांचा मृत्यू झाला होता त्यानंतर आता ही संख्या द्विगुणित झाल्याचे समजत आहे. हल्ल्यांनंतर सुरक्षा दलांनी या मृत दहशवाद्यानाकडील हत्यारे जप्त केली आहेत. तसेच उर्वरित शोध ,मोहिमेचे ऑपरेशन सुरु आहे. जम्मू काश्मीर: पुलवामा येथील अरिहल येथे IED हल्ला; 9 जवान जखमी

ANI ट्विट

याआधी शनिवारी बारामुला जिल्ह्यात सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत 'जैश ए मोहम्मद'चा दहशतवादी ठार झाला होता. बारामुला जिल्ह्यातील उरी येथे मारल्या गेलेला हा दहशतवादी 'जैश'चा टॉप कमांडर लुकमान होता. तो दक्षिण काश्मीरहून उत्तर काश्मीरच्या दिशेने जात होता. पाकिस्तानमधून भारतात घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना मदत करायला जात असताना सुरक्षा दलाने त्याचा खात्मा केला.