Representational Image (Credits: Wikimedia Commons)

दिल्ली मध्ये काल नरेंद्र मोदी 3.0 अर्थात पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी तिसर्‍यांदा विराजमान झाले. त्यांच्या नेतृत्त्वाखाली नव्या मंत्रिमंडळाने शपथ घेतल्यानंतर आज नव्या आठवड्यात पहिल्याच दिवशी शेअर बाजारात आनंदाचं वातावरण दिसलं आहे. आज सेन्सेक्स आणि निफ्टी ही उच्चांकी दिसली आहे. सरकार स्थापनेनंतर शेअर बाजाराला चालना मिळाल्याचे दिसले आहे. हा अहवाल दाखल करत असताना सेन्सेक्स 0.3 टक्क्यांनी वाढून 76,890.34 अंकांवर आणि निफ्टी 0.4 टक्क्यांनी वाढून 23,372 अंकांवर गेली होती. आजच्या सुरुवातीच्या वेळी त्यांनी अनुक्रमे 76,960.96 अंक आणि 23,411.90 अंकांवर विक्रमी उच्चांक गाठला.

बहुतांश क्षेत्रीय निर्देशांक आज बाजार उघडताच हिरव्या रंगात होते. जसजसा आठवडा पुढे सरकत जाईल तसतसे विश्लेषकांचा असा विश्वास आहे की गुंतवणूकदार आगामी यूएस फेड व्याजदर निर्णय, भारतातील महागाई डेटा (किरकोळ आणि घाऊक दोन्ही) आणि नवीन सरकारच्या निर्णयांवर लक्ष ठेवतील. Narendra Modi Government Cabinet 3.0: भारताला मिळाले नवे सरकार; आज Narendra Modi यांच्यासह 72 मंत्र्यांनी घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ, जाणून घ्या संपूर्ण यादी .

लोकसभेचे निकाल जाहीर झाल्याच्या दिवशी भारतीय शेअर्समध्ये घसरण पहायला मिळाली होती. एक्झिट पोलचे अंदाज चूकीचे ठरवत भाजपाची कामगिरी जेव्हा अपेक्षेपेक्षा कमी झाली तेव्हा शेअर बाजार कमालीचे गडगडले होते.