शरद पवार आज घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट; शेतकर्‍यांचे प्रश्न, राज्यातील सत्ता संघर्ष यांच्यावर चर्चेची शक्यता
Sharad Pawar and Narendra Modi (File Photo)

महाराष्ट्रामध्ये सत्ता संघर्ष आणि राजकीय कोंडी कायम असताना आज (20 नोव्हेंबर) राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची भेट आज दुपारी 12 ते 12.30 च्या दरम्यान होण्याची शक्यता आहे. या भेटीमध्ये शरद पवार पंतप्रधानांना राज्यातील अवकाळी पाऊस आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीची माहिती देणार आहेत. तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असल्याने शेतकर्‍यांना नुकसान भरपाई वेळेत मिळावी याविषयी बोलणी होणार असल्याचं सआंगितलं जात आहे. शरद पवारांना भाजपा ने दिली राष्ट्रपती पदाची ऑफर? महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाला वेगळं वळण लागण्याची शक्यता- सूत्र.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचारसभे दरम्यान तसेच लोकसभेच्या वेळेसही प्रचार करताना भाजपा नेत्यांकडून शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आली होती. मात्र आता शरद पवार नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याने दिल्ली सोबतच महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी राज्यसभेच्या 250 व्या ऐतिहासिक अधिवेशनाचं औचित्य साधत नरेंद्र मोदी यांनी सभागृहाला संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कौतुक केले होते.

ANI Tweet  

मागील काही दिवसांपासून शरद पवारांनी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांना भेट देऊन अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे. लवकरच राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे.