Husband-Wife Divorce | Edited Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: Pixabay)

घटस्फोटाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. नातेसंबंधात सुधारणा होण्याची काहीच शक्यता नसले तर पती-पत्नीला घटस्फोटासाठी सहा महिने थांबण्याची गरज नाही. संविधानाच्या अनुच्छेद 142 च्या तरतुदींचा वापर करून दाम्पत्य घटस्फोट घेऊ शकतात. त्यासाठी सहा महिने थांबण्याची गरज नाही, असा ऐतिहासिक निर्णय निर्णय दिला आहे. त्यामुळे कौटुंबिक ताणतणावातून जात असलेल्या दाम्पत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सध्या फॅमिली कोर्टाकडून या दोन्ही पक्षाला विचार करण्यासाठी आणि संबंधात सुधारणा करण्यासाठी सहा महिन्याचा वेळ दिला जातो. त्यामुळे अनेकांना घटस्फोटासाठी सहा महिने थांबावे लागते. तर काहींचा सहा महिन्यात घटस्फोट घेण्याचा विचार बदलतो. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात मोठा निर्णय दिला आहे. सहा महिन्यानंतर आणि त्यानंतरही नातेसंबंधात सुधारणा होत नसेल तर सहा महिने थांबण्याची गरज नाही. दाम्पत्य लवकर घटस्फोट घेऊ शकतात, असं सर्वोच्च न्यायालयाने निकालात म्हटलं आहे.

पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. कोणत्याही बंधनाशिवाय पूर्ण न्याय करण्याचा कोर्टाला अधिकार आहे यात कोणतीच शंका नाही. त्यामुळेच नात्यात कधीही सुधारणा न होऊ शकत नसेल तर घटस्फोट देणं कोर्टालाही शक्य आहे, असं खंडपीठाने म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठीने 29 सप्टेंबर 2022 रोजी या प्रकरणी आपला निर्णय राखून ठेवला होता.