मिखील व नितीन कामत (संग्रहित संपादित प्रतिमा)

कोणाचीही मदत-पाठींबा नसताना, स्वतःच्या कर्तुत्वावर मोठे विश्व उभा करणाऱ्या तरुणांची यादी जाहीर झाली आहे. ट्रेड व्हॉल्यूममध्ये भारताची सर्वात मोठी स्टॉक ब्रोकरेज कंपनी Zerodha चे सह-संस्थापक नितीन कामत आणि निखिल कामत (Nitin and Nikhil Kamat) यांनी, आयआयएफएल वेल्थ हुरुन इंडिया 40 आणि सेल्फ मेड मेड रिच लिस्ट 2020 (IIFL Wealth Hurun India 40 & under Self-Made Rich List 2020) मध्ये पहिले स्थान मिळवले आहे. हे दोन्ही बंधू देशातील 40 वर्षांखालील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांची एकूण मालमत्ता 24 हजार कोटींपेक्षा जास्त आहे. या यादीमध्ये 1000 कोटींपेक्षा अधिक संपत्ती असलेल्या 40 वर्षांखालील अशा अब्जाधीशांचा समावेश आहे, ज्यांनी स्वतःच्या मेहनतीने आपला व्यवसाय उभारला आहे.

पहा Top 10 यादी –

  • media.net संस्थापक 38 वर्षीय दिव्यांक तुरखिया यांनी 14,000 कोटी संपत्तीसह या यादीमध्ये दुसरे स्थान मिळवले आहे.
  • तिसरे स्थान उडानचे सहसंस्थापक- आमोद मालवीय, वैभव गुप्ता आणि सुजित कुमार यांनी विभागून दिले आहे.
  • Think & Learn चे मालक रिजू रवींद्रन 7,800 कोटी रुपयांच्या संपत्तीसह देशातील सहावे श्रीमंत व्यक्ती आहेत.
  • फ्लिपकार्टचा बिन्नी बन्सल सातव्या क्रमांकावर आहे. त्यांची मालमत्ता 7,500 कोटी रुपये आहे.
  • या दहा अव्वल उद्योगपतींच्या यादीत फ्लिपकार्टच्या सचिन बन्सलचेही नाव आहे, ज्यांची संपत्ती 7,500 कोटी रुपये आहे.
  • रितेश अग्रवाल हा 26 वर्षांचा ओयो रूम्सचा मालक आपल्या 4,500 संपत्तीसह या यादीमध्ये 9 व्या क्रमांकावर आहे.
  • भाविश अग्रवाल हे या यादीमध्ये 10 व्या क्रमांकावर असून, त्यांची संपत्ती 3500 कोटी आहे.

दरम्यान, या यादीमध्ये एकमेव महिला देविता सराफ या 16 व्या स्थानवर आहेत. त्यांची संपत्ती 1200 कोटी आहे. या यादीमधील 17 पैकी 15 उद्योजक भारतात राहतात. भारतात बेंगळुरूमध्ये 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या सेल्फमेड व्यवसायिकांची संख्या जास्त आहे.