New series of Rs 100 denomination banknotes | Representative Image. (Photo Credit: Pixabay)

रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) लवकरच 100 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणणार आहे. या नव्या नोटांवर गव्हर्नर शक्तीकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांची स्वाक्षरी असणार आहे. मात्र या नव्या नोटा चलनात आल्यामुळे जुन्या नोटांवर कोणताही परिणाम होणार नाही. जुन्या नोटाही व्यवहारात वापरता येतील.

आरबीआय लवकरच महात्मा गांधी नव्या सिरीजमधील 100 रुपयांच्या नोटा चलनात आणेल. या नव्या नोटांचे स्वरुप पूर्वीच्या सर्व नोटांप्रमाणेच असेल. अलिकडेच आरबीआयने 100 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या होत्या. जुलै 2018 मध्ये चलनात आलेल्या या नोटांचा रंग लव्हेंडर आहे. यावर गुजरात मधील यूनेस्को हेरिटेज तर दुसऱ्या बाजूला 'राणी की वाव' आणि समोरच्या बाजूला महात्मा गांधीची प्रतिमा आहे. मात्र या नव्या चलनात आलेल्या नोटांवर सोशल मीडियात अनेक जोक्स व्हायरल झाले.

जुलै 2018 मध्ये जारी झालेल्या या नोटांचा आकार काहीसा लहान असल्याने सुरुवातीला काही दिवस बाजारात या नोटा नाकारल्या गेल्या. मात्र कालांतराने या नोटा लोकांकडून स्वीकारल्या जावू लागल्या.