RBI कडून  क्रेडिट आणि डेबिट कार्ड बाबत नवी नियमावली जारी; 1 जुलै पासून होणार अंमलबजावणी
File image of Reserve Bank of India (RBI) | (Photo Credits: PTI)

रिझर्व्ह बॅंक ऑफ़ इंडिया अर्थात आरबीआय कडून नुकतेच क्रेडिट ( Credit Card) आणि डेबिट कार्ड (Debit Card ) जारी करण्यासाठी मुख्य दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. आता Credit Card and Debit Card - Issuance and Conduct Directions, 2022 सर्व अनुसूचित बँकांना (पेमेंट बँका, स्टेट कॉ. वगळता) लागू होणार आहेत. -ऑपरेटिव्ह बँका, आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका) तसेच भारतात कार्यरत असलेल्या सर्व नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFC)यांना आरबीआयचे नवीन निर्देश 01 जुलै 2022 पासून लागू केले जाणार आहेत.

आरबीआय कडून आता नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांना (क्रेडिट कार्ड जारी करण्यासाठी 100 कोटींची अट असणार आहे. ज्या नॉन बॅकिंग वित्तीय कंपन्या धोका पत्कारु शकतात त्यांना या व्यवसायात उतरण्याची मुभा असणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमावलीनुसार, आतापर्यंत बँकांकडून क्रेडिट कार्ड जारी केले जात होते. हे काही अधिकृत संस्थांद्वारे देखील जारी केले जाऊ शकतात, परंतु आतापर्यंत नेट वर्थवर कोणतीही मर्यादा नव्हती. केवळ दोन NBFC क्रेडिट कार्ड जारी केली जात होती त्यामध्ये SBI कार्ड आणि BoB कार्डचा समावेश आहे. ते दोघेही सरकारी यंत्रणांच्या अंतर्गत येत असल्याने क्रेडिट कार्ड जारी करत आहेत. इथे जाणून घ्या क्रेडिट कार्ड्स, डेबिट  कार्ड्स बाबतची नवी नियमावली सविस्तर!

आरबीआयने नवीन मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यास बँका आणि NBFCs वर आकारण्यात येणारा दंड देखील लागू केला आहे. उदाहरणार्थ, ग्राहकांच्या संमतीशिवाय क्रेडिट किंवा डेबिट कार्ड जारी किंवा अपग्रेड केल्याबद्दल बँकांवर दंड आकारला जाणार आहे.