Gaurav Taneja, Former AirAsia pilot (Photo Credits: Screengrab/Flying Beast)

'Flying Beast'च्या गौरव तनेजा (Gaurav Taneja) या लोकप्रिय युट्युबरने आता नवं 'Rasbhari Ke Papa'हे गेमिंग चॅनल सुरू केलं आहे. दरम्यान त्याचा पहिला व्हिडिओ अपलोड झाला असून त्याला 1 मिलियनच्या पार व्ह्यूज मागील 10 तासांमध्ये मिळाले आहेत. तर सबस्क्राईबर्सची संख्या देखील 464K च्या पलिकडे गेले आहेत. दरम्यान एअर एशिया या विमान कंपनीत पायलट म्हणून काम करणार्‍या गौरवने प्रवाशांची सुरक्षितता लक्षात न घेता कंपनी राबवत असलेल्या काही धोरणांवर बोट उचललं होतं. त्यामुळे त्याला बडतर्फ केले आहे. यानंतर तो चांगलाच चर्चेमध्ये आहे.

गौरव तनेजाने पोस्ट केलेल्या पहिल्या व्हिडिओमध्ये त्याने चॅनलवर कशाप्रकारे व्हिडिओ पोस्ट केले जातील याची माहिती दिली आहे. यामध्ये आठवड्याला गौरव 3 व्हिडिओ पोस्ट करेल. त्यानंतर नियमित व्हिडिओ पोस्ट करायचा का? याचा निर्णय युजर्सचा प्रतिसादावर अवलंबून असेल.

गौरव तनेजा ट्वीट

गौरव तनेजा पहिला व्हिडिओ

गौरव तनेजा, त्याची पत्नी रितू आणि लेक रसभरी यांचे अनेक धम्माल मस्तीचे व्हिडिओ 'Flying Beast'या त्याच्या युट्युब चॅनेलवर टाकल्यानंतर व्हायरल झाले आहेत. जगभरात त्याचे चाहते आहेत. गौरव तनेजाची पत्नी देखील पायलट आहे. त्यांच्या व्यायसायिक, खाजगी आयुष्यातील अनेक क्षण ते युट्युब चॅनलच्या माध्यमातून शेअर करत असतात.

दरम्यान कोरोना संकटकाळात एअर एशियाने पुरेशी काळजी घेतली नसल्याचं, इंधन वाचवण्याच्या हट्टामध्ये फ्लॅप 3 आणि फुल फ्लॅप याबद्दल कंपनीचे असलेले नियम, कंपनीच्या एच आर पॉलिसी आणि त्याचा कर्मचार्‍यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम तसेच प्रवाशांच्या सुरक्षेकडे केलेला कानाडोळा अशा मुद्द्यांवर गौरवने आपली रोखठोक मतं मांडली होती. दरम्यान त्याच्या या आरोपांनंतर DGCA ने देखील या प्रकरणामध्ये लक्ष घातले असून कंपनीकडे जबाब मागितला आहे.