Rajiv Gandhi Bharat Ratna Controversy: राजिनामा देणार नसल्याचे आप आमदार अलका लांबा यांचे स्पष्टीकरण
AAP MLA Alka Lamba (Photo Credits: ANI)

1984 च्या शिख दंगलीचे समर्थन केल्याबद्दल दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा भारत रत्न काढून घेण्याची मागणी आपचे आमदार जर्नेलसिंग यांनी केली होती. दिल्ली विधानसभेत असा प्रस्तावही मंजूर करण्यात आला होता. मात्र आपच्या आमदार अलका लांबा (Alka Lamba)

यांनी सोशल मीडियावर व्यक्त होत या प्रस्तावावर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर अलका लांबा राजीनामा देणार का? अशा चर्चांना उधाण आले. यावर पदाचा राजिनामा देणार नसल्याचे अलका लांबा यांनी एएनआयशी बोलताना स्पष्ट केले आहे.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी देखील अलका लांबा राजिनामा देणार नसल्याचे सांगितले आहे. अलका लांबा राजिनामा देत नसून या सर्व अफवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मात्र राजीव गांधींचा भारतरत्न पुरस्कार परत घ्यावा अशी मागणी करणारे आपचे आमदार जर्नेलसिंग यांनी ती माझी भावना होती आणि मी ते बोललो, असे स्पष्टीकरण दिले आहे.