एक्सप्रेस ट्रेनने (Express Train) चक्क हत्तीला (Elephant) धडक (Puri-Surat Express Train Hitting An Elephant) दिली. या धडकेमुळे रेल्वेची सहा चाके रुळावरुन घसरली. ही घटना ओडिशा (Odisha) राज्यातील संबलपुर (Sambalpur) डिविजन हद्दीत मध्य रात्री 2.04 दरम्यान घडली. पुरी-सूरत एक्सप्रेस (uri-Surat Express Train) ट्रेनने रुळावर आलेल्या हत्तीला धडक दिली आणि ही घटना घडली.
इस्ट कोस्ट रेल्वे (East Coast Railway) प्रशासनाने घटनेबाबात माहिती देताना सांगितले की, पुरी-सुरत एक्सप्रेस ट्रेन आपल्या नियोजित वेळापत्रकानुसार रुळावरुन धावत होती. मध्य रात्री 2.04 च्या सुमारास ही ट्रेन आपल्या ओडिशातील हटिबारी आणि मानेश्वर रेल्वे स्टेशन दरम्यान असलेल्या मार्गावरुन मार्गक्रमण करत होती. दरम्यान, अचानकपणे एक मोठा हत्ती रुळावर आला. गाडीने हत्तीला धडक दिली. (हेही वाचा, Elephants Eating Sugarcane Viral Video: हत्तीच्या कळपाने रस्त्यात ट्रक थांबवत केली ऊस खाण्यास सुरूवात; व्हिडिओ पाहून नेटीझन्स म्हणाले, 'ही कर वसूल करण्याची योग्य पद्धत')
Six wheels of the train engine derailed following the accident. Passengers on-board and loco pilots are safe: East Coast Railway https://t.co/GBaf7B5EgX
— ANI (@ANI) December 21, 2020
इस्ट कोस्ट रेल्वेने अधिक माहिती देताना सांगितले की, पुरी-सुरत एक्सप्रेस ट्रेनने रुळावर आलेल्या हत्तीला धडक देता अनर्थ घडला. रेल्वे इंजिनची सहा चाके रुळावरुन घसरली. त्यामुळे रेल्वे जागेवरच थांबावी लागली. दरम्यान, या घटनेत सर्व प्रवाशी सुरक्षीत असून कोणत्याही प्रकारची जीवीत हानी झाली नाही. रेल्वेची चाके रुळावर आण्याण्याचे काम प्रदीर्घ काळ सुरु होते.