PM Modi (फोटो सौजन्य - ANI)

Mahashivratri 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाशिवरात्रीनिमित्त (Maha Shivratri 2025) देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना लोकांच्या समृद्ध आणि चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी X वर लिहिले की, "मी माझ्या सर्व देशवासियांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. हा दिव्य प्रसंग तुम्हा सर्वांना आनंद, समृद्धी आणि चांगले आरोग्य घेऊन येवो आणि विकसित भारताचा संकल्प बळकट करो. हर हर महादेव!" अशा आशयाची पोस्ट पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशवासीयांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही महाशिवरात्रीच्या खास शुभेच्छा देशवासीयांना दिल्या आहेत. "महाशिवरात्रीच्या पवित्र सणानिमित्त सर्व देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा. शिव आणि शक्तीच्या मिलनाचा हा सण अध्यात्म, आत्मनिरीक्षण आणि श्रद्धेचा एक महान सण आहे. मी देवाधिदेव महादेव यांना सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतो", असे शाह यांनी एक्सवर लिहिले. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नागरिकांच्या आनंद, समृद्धी आणि आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.