Prime Minister Narendra Modi | (Photo Credits: Getty Images)

जम्मू-कश्मीरच्या (Jammu-Kashmir)  कलम 370 (Article 370) हटविण्याच्या ऐतिहासिक निर्णयावर आज अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) देशाला संबोधित करणार आहे. आज संध्याकाळी 4 वाजता ऑल इंडिया रेडिओ (आकाशवाणी) वरुन ते देशाला संबोधित करणार आहे. 7 ऑगस्टला मोदी या मुद्यावर देशाला संबोधित करणार होते. मात्र सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांच्या अकाली निधनामुळे ते पुढे ढकलण्यात आले. याआधी 27 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राष्ट्राला उद्देशून भाषण केले होते.

हा आठवड्यात भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला असा ऐतिहासिक निर्णय झाला. गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु असलेल्या जम्मू-कश्मीर मुद्यावर गृहमंत्री अमित शहा यांनी कलम 370 हटवून एक नवा इतिहास घडवला. या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी बोलतील किंवा काय बोलतील यावर सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची निधनाची बातमी ऐकताच हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला.

ANI चे ट्विट:

त्यावर आज अखेर जम्मू-काश्मीर राज्याची पुनर्रचना, नव्या लडाख राज्याची निर्मिती, जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम ३७० मधील तरतुदी हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय, या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांना संबोधित करणार आहेत.

हेही वाचा- Jammu and Kashmir: जम्मू-कश्मीर मधील कलम 370 रद्द, विभाजन विधेयक 370 विरुद्ध 70 मतांनी लोकसभेत मंजूर

केंद्राने जम्मू-कश्मीरबाबत जे महत्वपुर्ण पाऊल उचलले आहे त्यामागे नेमकी काय रणनीती होती, त्याचा उद्देश काय, जनतेला त्याचा काय फायदा होईल, हे या भाषणात मोदी नमूद करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.