Teachers’ Day 2020 Celebration: भारतामध्ये 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन (Teachers' Day) म्हणून साजरा केला जातो. यंदाच्या शिक्षक दिनी केंद्रीय शालेय मंत्रलयाकडून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या शिक्षक दिन 2020 च्या औचित्याने देशभरातील काही शिक्षकांना त्यांच्या शिक्षण व्यवस्थेमधील योगदानाबद्दल गौरवलं जाणार आहे. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ram Nath Kovind) नॅशनल अवॉर्ड देऊन त्यांना गौरवतील. मात्र कोरोना संकटकाळात हा कार्यक्रम व्हर्च्युअल मोडमध्ये असेल. National Award for Teachers साठी यंदा 47 शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.
केंद्रीय शालेय मंत्रालयाकडून रमेश पोखरियाल यांनी ट्वीटरच्या माध्यामातून ही माहिती दिली आहे. तसेच यंदाच्या शिक्षक दिनी University Grants Commission आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नव्या शिक्षण पद्धतीचा अवलंब केला आहे त्याची माहिती देण्यासाठी विशेष वेबिनारचं आयोजन केलं आहे. सोशल मीडीयावर देखील शिक्षकांना धन्यवाद म्हणण्यासाठी एका विशेष कॅम्पेनला लॉन्च करण्यात आले आहे.
Join us for the National Awards to Teachers 2020 felicitation programme on 📅5 Sept;🕚11 AM
Hon'ble President of India Shri Ram Nath Kovind Ji will grace the event with his presence as the Chief Guest. @rashtrapatibhvn #TeachersFromIndia #NAT2020 pic.twitter.com/6fNtIfp4vf
— Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) September 4, 2020
दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील 'मन की बात' मध्ये कोरोना संकट काळात शिक्षकांनी स्वीकारलेल्या आव्हानाचं कौतुक केले आहे. या कठीण काळात देखील शिक्षक ऑनलाईन माध्यमातून ज्ञानदानाचा वसा कायम ठेवत आहेत ते वाखाण्याजोगे असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.