कांद्याला कमी भाव आल्याच्या निषेधार्थ एका शेतकऱ्याने पंतप्रधान कार्यालयाला कांदा विक्रीतून आलेली रक्कम मनीऑर्डर केली. महाराष्ट्रातील नाशिक जिल्हातील निफाड तालुक्यातील नैताळे येथील शेतकरी संजय साठे यांनी ही मनीऑर्डर पाठवली होती. मात्र पंतप्रधान कार्यालयाने 1064 रुपयांची मनीऑर्डर परत पाठवली आहे. पंतप्रधान मोदींना मनीऑर्डर: संजय साठे यांची PMOकार्यालयाकडून दखल
लासलगाव बाजार समितीत लिलावासाठी कांद्याला अगदी कवडीमोल भाव मिळाला होता. त्यामुळे मिळालेली रक्कम पंतप्रधानांना मनीऑर्डर करत या शेतकऱ्याने आपली व्यथा मांडली होती. मात्र त्यावर कोणतेही उत्तर न देता मोदी सरकारने ही मनीऑर्डर परत पाठवली. त्यामुळे शेतकरी संतापले आहे.
अलिकडेच चंद्रकांत देशमुख या शेतकऱ्याने कांद्याला योग्य भाव न मिळाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना 216 रुपयांची मनीऑर्डर पाठवली होती. 5 डिसेंबरला झालेल्या कृषी उत्पादन बाजार समितीच्या लिलावात 545 किलोग्रॅम कांद्याच्या विक्रीनंतर शेतकऱ्याला ही रक्कम प्राप्त झाली होती. तर लसणाला 2 रुपये किलो असा भाव मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाजारीचे वातावरण आहे.