Prahlad Patel And Chai Tapri (Photo Credits: Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi) 'चहावाले ते पंतप्रधान' हा प्रवास खूपच अद्भूत आणि विलक्षणीय होता. त्यामुळे जेव्हा जेव्हा पंतप्रधान मोदींच्या खडतर प्रवासाचा उल्लेख केला जातो तेव्हा त्यांचा चहाचा व्यवसाय आणि ती चहाची टपरी याची आठवण आर्वजून काढली जाते. त्यामुळे पंतप्रधानाच्या जडणघडणीत महत्त्वाची समजली जाणारी ही चहाची टपरी आता पर्यटन स्थळ म्हणून विकसित केली जाणार आहे. लोकमत ने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल (Prahlad Patel) हे नुकतेच वडनगर (Vadnagar) येथे गेले होते. त्यावेळी त्यांनी अशा स्थळांचा आगामी काळात पर्यटन स्थळ म्हणून विकास करता येईल अशा घोषणा केली आहे.

प्रल्हाद पटेल यांनी वडनगर रेल्वे स्टेशनला भेट दिली. याच प्लॅटफॉर्मवर ही टपरी आहे, जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी लहान असताना घरातील आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे येथे चहा विकायचे. अनेकदा पंतप्रधान मोदींनीच या चहाच्या टपरीचा उल्लेख केला आहे.

हेही वाचा- PM नरेंद्र मोदी यांना आणखी एक पुरस्कार, Swachh Bharat अभियानासाठी अमेरिकेत होणार गौरव

जेव्हा पर्यटन मंत्री प्रल्हाद पटेल या परिसराची पाहणी करण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी मोदी जिथे चहा विकायचे त्या चहाच्या टपरीची देखील पाहणी केली. या टपरीचा पत्र्याच्या काही भागाला गंज लागल्यामुळे तो खराब झाला आहे. त्यामुळे ही टपरी सुरक्षित ठेवण्यासाठी याला काचांनी संरक्षित करण्याचे आदेश दिले आहे. तसेच ह्या टपरीत काही बदल न करता ही चहाची टपरी आहे तशीच ठेवण्याची सूचनाही प्रल्हाद पटेल यांनी अधिका-यांना दिल्या आहेत.

2014 च्या लोकसभा निवडणुकां वेळी काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर चहा विकण्याच्या मुद्द्यावरुन टीका केली होती. त्यानंतर भाजपने त्यांच्या वक्तव्याचा कडाडून विरोध करत 'चाय पे चर्चा' हा कार्यक्रम आयोजित केला होता.