देशभरात दिवाळीचा उत्साह आणि जल्लोष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील ही दिवाळी भारत-चीन सीमेवरील जवानांसोबत साजरी करणार आहेत. यासाठी बुधवारी (7/11/2018) मोदी उत्तराखंडची राजधानी डेहरादून येथे दाखल झाले. सर्वप्रथम मोदी केदारनाथचे दर्शन घेतील. केदारनाथ मंदिरात पूजा केल्यानंतर हर्षिल बॉर्डच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करतील.
पंतप्रधान मोदींच्या या कार्यक्रमाची सरकार गेल्या अनेक दिवसांपासून तयारी करत आहे. यासाठी व्हिआयपी हेलीपॅडपासून ते केदारनाथ मंदिरापर्यंतच्या मार्गावरील बर्फ हटवण्यात आला आहे.
Uttarakhand: Prime Minister Narendra Modi arrives in Dehradun; he will celebrate the festival of #Diwali in Kedarnath pic.twitter.com/rAhdGJg1Dd
— ANI (@ANI) November 7, 2018
जवानांसोबत दिवाळी साजरी करताना मोदींसोबत लष्कर प्रमुख बिपिन रावत आणि सैन्याचे अन्य अधिकारी देखील हजर असतील. तसंच या कार्यक्रमासाठी आयटीबीपीचे डिरेक्टर जनरल आरके पंचनंदा देखील काल संध्याकाळी हर्षिल बॉर्डरवर दाखल झाले.