दरवर्षीप्रमाणे यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सैनिकांसोबत आपली दिवाळी (Diwali 2020) साजरी केली. यासाठी पंतप्रधान मोदी यावेळी जैसलमेर, लोंगेवाला पोस्टवर (Longewala Post) पोहोचले. येथे त्यांनी सैनिकांसह दिवाळी साजरी केली, त्यांना प्रोत्साहन दिले. यासह, पीएम मोदी यांनी एका टँकवर देखील प्रवास केला. 1971 च्या लोंगेवाला युद्धात या चौकीवर सैनिकांची संख्या कमी असूनही, भारतीय सैनिकांनी मोठ्या शौर्याने पाकिस्तानी सैन्याचा सामना केला होता. लोंगेवालाच्या लढाईवरच प्रसिद्ध ‘बॉर्डर’ चित्रपट तयार करण्यात आला आहे. आज पीएम मोदींनी या चौकीला भेट दिली.
आधी पोस्ट आणि नंतर जैसलमेर एअरबेसवर देशातील शूर सैनिकांना पीएम मोदींनी संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले. ’तुमच्यातील जोश, या आवेगामुळेच देशाचे आश्वासन मिळते. तुमच्या एका हुंकारामुळे शत्रू थरथर कापतात, त्यांना घाम फुटतो. दिवाळीच्या दिवशी अंगणात शुभ-लाभ, रिद्धि-सिद्धी किंवा रांगोळीची परंपरा आहे. यामागील विचार असा आहे की, दिवाळीला घरी समृद्धी येईल. त्याचप्रमाणे, देशाच्या सीमा एक प्रकारे देशाचे प्रवेशद्वार आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्राची भरभराट, सौभाग्य आणि समृद्धी ही तुमच्यामुळे व तुमच्या पराक्रमामुळे आहे. म्हणूनच आज देशातील प्रत्येक घरात आपल्यासाठी दीप प्रज्वलित केले जात आहेत.' (हेही वाचा: Diwali 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जेपी नड्डा, अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यासह 'या' नेत्यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा)
#WATCH राजस्थान: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने लोंगेवाला, जैसलमेर की यात्रा के दौरान जवानों को मिठाई बांटी। #दिवाली pic.twitter.com/pKoY9jBkVD
— ANI_HindiNews (@AHindinews) November 14, 2020
#WATCH प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जैसलमेर के लोंगेवाल में सेना के एक टैंक की सवारी करते हुए। pic.twitter.com/uu1vqUX4QD
— ANI_HindiNews (@AHindinews) November 14, 2020
Laid a wreath at the war memorial at Longewala, Rajasthan. pic.twitter.com/ULt7estyb2
— Narendra Modi (@narendramodi) November 14, 2020
टँकवरील प्रवास झाल्यानंतर, पंतप्रधानांनी जवानांमध्ये मिठाईचे वाटप केले. यावेळी महिला लष्करी जवानही उपस्थित होते. या कार्यक्रमात कोविड प्रोटोकॉलचे अनुसरण केल्याचे सांगण्यात आले. यावेळी त्यांनी 1971 च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धातील ब्रिगेड कुलदीपसिंह चांदपुरी यांच्या पराक्रमाला सलाम केले. ते म्हणाले की, पाकिस्तानविरूद्ध 1971 चे युद्ध हे सैन्य, नौदल आणि हवाई दल यांच्यातील अनुकरणीय समन्वयाचे उदाहरण होते. दरम्यान, 2014 पासून पंतप्रधान मोदी आपली दिवाळी देशाच्या सैनिकांसोबत साजरी करत आहेत. यावेळीही त्यांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली.