भारतात आलेल्या अम्फान चक्रीवादळाने (Cyclone Amphan) पश्चिम बंगाल, ओडिशामध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. येथील अनेक जिल्हे पाण्याखाली गेले असून या चक्रीवादळाने विध्वंस केला आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee)यांनी हवाई सर्वेक्षण केले आहे. पीएम मोदी बाधित भागांचे हवाई सर्वेक्षण केल्यानंतर बैठक घेऊन ज्यात पीडित लोकांसाठी मदत आणि पुनर्वसनावर चर्चा केली.
पश्चिम बंगालमध्ये या वादळामुळे 80 लोकांचा मृत्यू झाला आहे. या लोकांना नुकसान भरपाईची घोषणा करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी, पंतप्रधान मोदींना बाधित भागाचा दौरा करण्याचे आवाहन केले होते. या वादळामुळे हजारो लोक बेघर झाले आहेत, अनेक पूल उद्ध्वस्त झाले आहेत आणि सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. कोलकाता व राज्यातील इतर अनेक भागात आपत्तीच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत. ओडिशाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या आकलनानुसार, सुमारे 44.8 लाख लोकांना चक्रीवादळाचा फटका बसला आहे. Cyclone Amphan: चक्रीवादळ 'अम्फान'चा कहर, कोलकाता विमानतळाचा एक भाग पाण्याखाली, पहा व्हिडिओ
पाहा काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडिओ
#WATCH: PM Narendra Modi conducts aerial survey of areas affected by #CycloneAmphan in West Bengal. CM Mamata Banerjee is also accompanying. pic.twitter.com/Da7NebJhws
— ANI (@ANI) May 22, 2020
केंद्र सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून पीडित लोकांसाठी मदत आणि पुनर्वसनावर भर देईल असे पंतप्रधानांनी सांगितले आहे.
बुधवारी आलेल्या या वादळामुळे कोलकाताचा पूर्ण चेहरा मोहराच बदलला आहे. कोलकात्यात 15 लोकांचा मृत्यू झाला आहे. जवळपास तीन तास 120 ते 133 कि.मी. वेगाने धावणाऱ्या वाऱ्यामुळे मोठा पाऊस झाला, यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.