सध्या संपूर्ण देश कोरोना व्हायरस (Coronavirus) सारख्या महाभयाण विषाणूने ग्रासलेला आहे. अशा परिस्थितीत गेले 3 महिने संपूर्ण देशभरात लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. हा लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरु आहे. अशामध्ये लोकांचे मनोबल वाढविण्यासाठी आणि कोरोनाविरुद्ध लढण्याचा त्यांचा आत्मविश्वास वाढिवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता 'मन की बात' (Mann ki Baat) या रेडिओ कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. यात देशातील कोरोनाची स्थिती, लॉकडाऊन, अनलॉक बाबत माहिती देतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'मन की बात' हा रेडिओ कार्यक्रम दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी होतो. त्यानुसार आज सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम तुम्ही मोबाईलवरही ऐकू शकता. त्यासाठी तुम्हाला 1922 मिस्ड कॉल द्यावा लागेल.
पीएम मोदी यांनी म्हटले होते की, देशातील सर्वजण कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आपली जनसंख्या अन्य देशांपेक्षा काही पटींने सर्वाधिक आहे. परंतु तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव अन्य देशांपेक्षा कमी प्रमाणात परसरला आहे. कोरोना व्हायरसमुळे बळींचा आकडा देशात कमी आहे. जे काही नुकसान झाले आहे त्याचे दु:ख सर्वांना आहे. परंतु जे काही आपण वाचवू शकलो आहे ते निश्चितपणे देशाच्या सामूहिक निर्धार शक्तीचा परिणाम आहे.
हा रेडिओ कार्यक्रम पहिल्यांचा 3 ऑक्टोंबर 2014 मध्ये सुरु करण्यात आला होता. त्यावेळी पहिल्यांदाच नरेंद्र मोदी सत्तेत आले होते. मन की बातसाठी नागरिकांनी त्यांच्या काही महत्वाच्या सूचना असल्यास त्यांनी टोल फ्री क्रमांक 1800-11-7800 येथे रेकॉर्ड करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच MyGov फोरम किंवा NaMo अॅपवर सुद्धा त्यांच्या आयडियाज शेअर करता येणार आहेत.