PM Narendra Modi Addresses The Nation: कोरोना विषाणूच्या लढाईमध्ये, प्रभू रामचंद्रासारखे मर्यादेचे पालन करण्याचे आणि रमजानमधील संयम व शिस्त अंगी बाळगण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
PM Narendra Modi. (Photo Credits: ANI)

भारतामध्ये वाढत असलेल्या कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गामुळे देशात भीतीचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी आरोग्य सेवा अपुऱ्या पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता आहे, तर काही ठिकाणी रुग्णांना बेड मिळणे मुश्कील झाले आहे. अनेक राज्यांमध्ये लसीचा साठा संपुष्टात आला आहे. या पार्श्वभुमीवर पीएम नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी देशातील कोरोना विषाणू परिस्थिती व त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांबाबत भाष्य केले.

यावेळी ते म्हणाले, ‘संसर्ग वाढल्यामुळे आता देशात औषधांचे उत्पादन वाढवण्यात आले आहेत. देशात फार मोठे फार्मा सेक्टर आहे, जे मोठ्या प्रमाणात औषधे उत्पादित करत आहे. अनेक ठिकाणी रुग्णालयातील बेड्सची संख्या वाढवली जात आहे. अनेक शहरांमध्ये मोठ मोठी कोरोना हॉस्पीटल्स उभारली जात आहेत. यासोबतच भारतामध्ये दोन लसींचे उप्त्पादन घेतले जात आहे त्याद्वारे देशात मोठ्या प्रमाणत लसीकरण मोहीम सुरु आहे. आता 1 मे पासून 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्वांना लस दिली जाणार आहे.’ (हेही वाचा: PM Narendra Modi Addresses The Nation: 'राज्य सरकारांनी शेवटचा उपाय म्हणून लॉकडाऊनचा पर्याय निवडावा'- पंतप्रधान नरेंद्र मोदी)

पुढे ते म्हणाले, ‘आज नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे. उद्या राम नवमी आहे. अशावेळी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचा हाच संदेश आहे की, आपण मर्यादांचे पालन करावे. कोरोनाच्या या संकटकाळात सुरक्षित राहण्याचे जे काही उपाय आहेत त्या सर्वांचे पालन करावे. ‘दवाई भी कढाई भी’ हा मंत्र फार महत्वाचा आहे. रमजानच्या पवित्र महिन्याचाही आज सातवा दिवस आहे. रमजान आपल्याला धैर्य, आत्म-संयम आणि शिस्त शिकवतो. कोरोनाची लढाई जिंकण्यासाठी शिस्तदेखील तितकीच आवश्यक आहे. त्यामुळे फक्त जेव्हा गरज असेल तेव्हाच बाहेर पडा.’

शेवटी ते म्हणाले, मी तुम्हाला विश्वास देतो, आज जी परिस्थिती आहे ती बदलण्यासाठी तुमच्या सर्वांच्या प्रयत्नांसोबत सरकर सर्वोतोपरी प्रयत्न करेल.’