PM Narendra Modi | (Photo Credits: IANS)

आज संपूर्ण देशभरात 'भारतीय सेना दिवस' (Indian Army Day) साजरा केला जात आहे. देशवासियांच्या रक्षणासाठी भारतभूमीच्या सेवेत अहोरात्र झटणा-या आणि वेळप्रसंगी आपल्या प्राणांचे बलिदान देणा-या भारतीय जवानांना सलाम करण्याचा आजचा हा खास दिवस! आज दिल्ली तसेच भारतीय सैन्यदलाच्या मुख्यालयात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आपल्या पराक्रमी भारतीय जवानांना आणि त्यांच्या कुटूंबियांना भारतीय सेना दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केले आहे.

"भारतभूमीच्या रक्षणालासाठी क्षणनक्षण व्यतीत करणा-या पराक्रमी सैनिकांना आणि त्यांच्या कुटूंबियांना या भारतीय सेना दिनाच्या शुभेच्छा. आपली सेना ही सशक्त, साहसी आणि संकल्पबद्ध आहे, ज्यामुळे आपल्या देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. सर्व देशवासियांकडून भारतीय सेनेला नमन." अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी भारतीय सेना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील भारतीय सेना दिनाच्या ट्विटच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. "आपली भारतीय सेना शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक आहे" असे त्यांनी सांगितले आहे.

देशातील पराक्रमी, धाडसी अशा शूरवीरांना मी आज भारती थल सेना दिवसाच्या शुभेच्छा असे अमित शाह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.