आजही पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण ; पेट्रोल 40 पैसे तर डिझेल 35 पैशांनी स्वस्त
पेट्रोल डिझेलच्या दरात घट (Photo Credits: File Photo)

गेल्या काही दिवासांपासून पेट्रोल डिझेलच्या दरांचा भडका उडाला होता. मात्र दसऱ्यापासून पेट्रोल डिझेलच्या दरात घसरण व्हायला लागली. त्यानंतर सातत्याने पेट्रोल डिझेलच्या दरात घट झालेली दिसून येत आहे. आज पेट्रोल 40 पैसे तर डिझेल 35 पैशांनी स्वस्त झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च तेलाच्या किंमतीत घट झाल्याने दरांची ही घसरण सुरु आहे.

राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 80.45 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 74.38 रुपये प्रति लीटर इतकी आहे. दिल्लीत 10 सप्टेंबरनंतर पेट्रोच्या दरात घसरण व्हायला लागली होती. यापूर्वी 4 ऑक्टोबरला राजधानीत पेट्रोलच्या दराने उच्चांक गाठला होता. तेव्हा पेट्रोलची किंमत 84 रुपये प्रति लीटर होती.

देशाची औद्योगिक राजधानी मुंबईत पेट्रोल 85.93 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 77.96 रुपये प्रति लीटरने मिळत आहे. मुंबईत आज पेट्रोल 40 पैसे प्रती लीटरने स्वस्त झाले.

डिझेलचा दराने मुंबईत 11 ऑक्टोबरला निच्चांक गाठला. 4 ऑक्टोबरला मुंबईत डिझेल 80.10 रुपये लीटरने मिळत होते. तर पेट्रोलच्या दराने उच्चांक गाठला होता. पेट्रोलची किंमत 91.34 रुपये प्रति लीटर झाली होती.

आंतरराष्ट्रीय बाजारात आयसीईवर ब्रेंड क्रूडमध्ये शुक्रवारी 0.66% घट झाल्याने 76.38 डॉलर प्रती बॅरल झाले होते. नायमॅक्सवर अमेरिकी लाईड क्रुड डब्ल्यूटीआय 0.95% घट झाल्याने 66.69 डॉलर प्रति बॅरल झाले होते.