सलग 11 व्या दिवशीही पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घसरण ; हे आहेत आजचे दर
पेट्रोल डिझेलच्या दरात घट (Photo Credits: File Photo)

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या किंमतींचा भडका उडाला होता. मात्र दसऱ्यापासून दर कमी होऊ लागले आणि सलग 11 दिवशीही या किंमतीत घट होताना दिसत आहे. यामुळेच पेट्रोल 2.75 तर डिझेल 1.74 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

आज दिल्लीत पेट्रोलच्या किंमतीत 0.40 पैशांनी घट झाली असून 80.05 रुपये लीटरने पेट्रोल मिळत आहे. तर डिझेलसाठी 74.05 रुपये मोजावे लागणार आहेत. डिझेलची किंमत 0.33 पैशांनी कमी झाली आहे.

मुंबईत पेट्रोल 0.39 पैसे आणि डिझेल 0.35 पैशांनी स्वस्त झाले आहे. म्हणजेच पेट्रोलसाठी 85.54 रुपये आणि डिझेलसाठी 77.61 रुपये मोजावे लागणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधन दरात झालेल्या कपातीचा फायदा भारतीयांना देखील होत आहे.