प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

Petrol Diesel Price Today: गेल्या काही दिवसांपासून देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. तर आज सलग 9 व्या दिवशी त्याचे दर वाढल्याचे दिसून आले आहे. दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचे दर 25 पैशांनी वाढल्याने आता पेट्रोल 89.54 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 79.95 प्रति लीटर झाले आहे. तसेच मुंबईत सुद्धा पेट्रोल 96.00 रुपये आणि डिझेल 86.98 रुपये प्रति लीटरने विक्री केले जात आहे. कोलकाता येथे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती क्रमश: 90.78 रुपये प्रति लीटर आणि 83.54 रुपये प्रति लीटर झाले आहे. चेन्नईत पेट्रोल 91.68 रुपये आणि डिझेल 85.01 रुपये प्रति लीटर झाले आहे.

गेल्या महिन्यात राजस्थान महिन्यात पेट्रोल आणि डिझेलवर वॅट दोन रुपयांनी प्रतिलीटर कमी झाले होते. भोपाळमध्ये XP पेट्रोल 100.44 रुपये प्रति लीटर झाले होते. देशातील अन्य ठिकाणी लखनौ मध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढून क्रमश: 88.06 आणि 80.33 रुपये झाले आहेत. भारताला पेट्रोलियम इंधानासाठी 80 टक्के आयातीवर अवलंबून रहावे लागते. केंद्राकडून पेट्रोलवर प्रति लीटर 32.9 रुपये आणि डिझेल वर प्रति लीटर 31.80 रुपये उत्पाद शुक्ल लावला जातो.(भोपाळमध्ये Premium Petrol Price ने शंभरी गाठल्याने तरूणाने बॅट, हेल्मेट उंचावत अनोख्या अंदाजात नोंदवला निषेध; फोटो व्हायरल)

Tweet:

काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमती सातत्याने वाढत असल्याने सरकारवर हल्लाबोल केला. विरोधकांनी तातडीने टॅक कमी करावी अशी मागणी केली आहे. तसेच पेट्रोलिमय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बुधवारी संसदेत असे म्हटले की, पेट्रोलियम उत्पादनांवरील शु्ल्कात घट करण्यात येणार नाही. कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ होत असल्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर त्याचा परिणाम होत असल्याचे प्रधान यांनी स्पष्ट केले आहे.