Odisha: चहा विक्रेत्याला 100 कोटींपेक्षा जास्त GST फसवणुकीसाठी नोटीस; जाणून घ्या काय आहे प्रकरण
जीएसटी (Photo Credits: PTI)

ओडिशाच्या (Odisha) राउरकेला (Rourkela) येथे जीएसटी (GST) फसवणूकीचे एक प्रकरण समोर आले आहे. राऊरकेला येथील चहा विक्रेत्यास 100 कोटींपेक्षा जास्त रुपयांच्या जीएसटी फसवणूकीसाठी नोटीस बजावण्यात आली आहे. गुड अँड सर्व्हिस टॅक्स विभागाने कार्तिक कमिलाला ही नोटीस पाठवली आहे, जो चहाचा स्टॉल चालवितो तसेच भाजीपाला विक्रीचा त्याचा व्यवसाय आहे. कार्तिक कमिलाने दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी काही जीएसटी अधिकारी त्याच्या चहाच्या दुकानावर आले. त्यांनी कार्तिकच्या व्यवसायाचा तपशील, आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे मागितली.’

त्यानंतर अधिकाऱ्यांनीच कार्तिकला त्याच्या नावावर 100.09 कोटी रुपयांच्या कराची फसवणूक झाली असल्याचे सांगितले. रिपोर्टनुसार, हा व्यवहार 'लिंगराज ट्रेडर्स' नावाच्या बनावट फर्मने केला होता, ज्याचे नाव कमिला आहे. मात्र अजूनतरी आरोपींवरील जीएसटी घोटाळा स्पष्ट झालेला नाही. यापूर्वीही राऊरकेलातील कोयल नगर जवळील एबी स्क्वेअरवर राहणाऱ्या एका पत्रकारावर गेल्या आठवड्यात जीएसटीचा आरोप झाला होता. नोटीसमध्ये जीएसटी अधिकाऱ्यांनी एम/एस नायक एंटरप्रायजेसच्या नावावर जीएसटी चोरी झाल्याचे नमूद केले होते. मात्र, आरोपींनी या फसव्या व्यवहाराबाबत दुर्लक्ष केले. (हेही वाचा: LPG Gas Cylinder Prices: एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या नवीन दर)

ऑक्टोबरमध्ये राउरकेला येथील सेक्टर-20 भागात राहणाऱ्या एका ड्रायव्हरलाही करपात्र वस्तू प्राप्त करण्यासाठी कलम 74 (5) अंतर्गत, एकूण कर देयकासह 23.96 कोटी रुपये आणि सीजीएसटी व एसजीएसटी अंतर्गत 4.31 कोटी रुपये मिळाले असल्याचा आरोप होता. त्यानंतर जीएसटी अधिका-यांनी वाहनचालकाला कलम 74 (5) अंतर्गत व्याज आणि दंडाच्या रकमेसह 4.31 कोटी रुपये भरण्यास सांगितले होते, मात्र आरोपीने याकडे दुर्लक्ष केले.