NAMO TV LIVE: लोकसभा निवडणूक 2019 पूर्वी Dish TV आणि Videocon DTH वर नमो चॅनल लाईव्ह; पहा काय आहे खासियत
Namo Channel (Photo Credits: Twitter)

आगामी लोकसभा निवडणूकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) जोरदार तयारीला लागले आहेत, असे म्हणण्यास काही हरकत नाही. कारण लोकसभा निवडणूकीपूर्वी व्हिडिओकॉन (Videocon DTH) आणि डिश टीव्ही (Dish TV) वर नमो चॅनल (Namo Channel) सुरु होणार आहे. हे चॅनल पूर्णपणे मोफत असून डीटीएचवर (DTH) तुम्ही अगदी विनाशुल्क या चॅनलचा आनंद घेऊ शकता. नमो चॅनलवर तुम्ह केंद्र सरकारच्या योजनांविषयी माहिती पाहू शकता. तसंच यावर नरेंद्र मोदींच्या नव्या-जुन्या भाषणांचे 24/7 प्रसारण केले जाईल. तसंच नमो टीव्हीवर तुम्ही मोदी सरकारच्या कामांच्या, योजनांच्या जाहीरातीही पाहू शकाल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नमो टीव्ही चॅनलचे अनेक दिवसांपासून परिक्षण सुरु होते. मात्र नमो टीव्ही ऑनलाईन सुरु आहे.

युजर्सच्या प्रतिक्रीया:

नमो टीव्ही ची चर्चा सध्या सोशल मीडियावरही रंगत आहे. एका युजरने दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओकॉनवर तुम्ही चॅनल नंबर 302 तर डिश टीव्हीवर चॅनल नंबर 770 वर तुम्ही नमो टीव्ही पाहू शकाल.