Mumbai Weather Prediction, June 29: मुंबईच्या आजच्या ताज्या हवामान अपडेटनुसार पुढील २४ तास शहर आणि उपनगरात असाच गारवा जाणवेल व पावसाच्या सरी कायम राहतील. भारतीय हवामान खात्याने आपल्या ताज्या मुंबई हवामान अपडेटमध्ये असे म्हटले आहे आज शुक्रवारी शहर आणि उपनगरात ढगाळ आकाश व मधूनमधून मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची डाट शक्यात आहे.आज शहरातील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस असेल.बीएमसीने आपल्या मुंबई हवामान अपडेटमध्ये पुढे म्हटले आहे की शुक्रवारी सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासांच्या कालावधीत शहरामध्ये 66.53 मिमी पावसाची नोंद झाली. पूर्व उपनगरात ७९.६५ मिमी तर पश्चिम उपनगरात ५९.४२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. काल रात्री पासून पावसाने ठाणे व मुंबईत काही ठिकाणी दमदार हजेरी लावली आहे. व आजही पूर्ण दिवसभर वातावरण ढगाळ असेल व अधून मधून मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल सोबतच पावसाचा अंदाज वर्तवता हवामान खात्याने यल्लो अलर्ट पण जारी केले आहेत. नैऋत्य मान्सून पुढे सरकल्याने पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आता उद्याचे मुंबईत वातावरण कसे असेल ह्यासाठी हवामान खात्याने मुंबई उद्याचे हवामान अंदाज लावला आहे. हेही वाचा:
पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज.
शहर आणि उपनगरात सामान्यतः आकाश ढगाळ राहील आणि मधूनमधून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२°C आणि २५°C च्या आसपास असेल.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) June 27, 2024
येत्या काही दिवसांत उत्तर अरबी समुद्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि आग्नेय राजस्थानच्या अतिरिक्त प्रदेशांमध्येही मान्सूनची प्रगती अपेक्षित आहे. पुढील ४-५ दिवसांत पश्चिम किनारपट्टीच्या काही भागांत आणि ईशान्य भारतामध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, मुंबई-ठाणे परिसरात उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून, किनाऱ्याजवळ काम करणाऱ्याना सावध राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. मच्छिमारांना 29 जूनपर्यंत किनारपट्टीवर जाऊ नये, असा सल्लाही देण्यात आला आहे.