दिल्लीतील (Delhi) एका फाईव्ह स्टार हॉटेलमधून (5 Star Hotel) अपहरण करण्यात आलेल्या एका उद्योगपतीची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. तब्बल 6 तासांच्या प्रयत्नांनंतर उद्योगपतीची सुखरुप सुटका करण्यात आणि अपहरण करणाऱ्या 6 महिल्यांच्या टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
मुंबईतील एका मरीन इंजिनियरिंग कंपनीच्या 64 वर्षीय मॅनेजिंग डिरेक्टरला दिल्लीतील चाणक्यपुरी परिसरातील एका हॉटेलमध्ये किडनॅप करण्यात आले. अपहरण केल्यानंतर महिलांच्या या टोळीने उद्योपतीच्या सहकाऱ्यांकडे 30 लाख रुपयांची मागणी केली. (पोटची मुलगी हवी म्हणून तीन वर्षाच्या मुलीचे नातेवाईंकाकडून अपहरण)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहरण झाल्यानंतर तपासात या उद्योगपतीने फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये चेक इन केल्याचे समोर आले. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास करण्यात आला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 64 वर्षीय सुरेंद्र कुमार हे मुंबईतील एका कंपनीचे मॅनेजिंग डिरेक्टर आहेत. फेसबुकवर त्यांची एका दिल्लीतील तरुणीशी ओळख झाली. कुमार हे कामानिमित्त अनेकदा दिल्लीला जात असतं. त्यामुळे त्या तरुणीशी भेटी-गाठी होत राहिल्या आणि तिने त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले.
काही दिवसांपूर्वी दिल्लील्या गेलेल्या कुमार यांच्याशी कुटुंबियांचा संपर्क होत नव्हता. तेव्हा कुटुंबियांनी पोलिसात तक्रार केली. पोलिस तपासात या सर्व प्रकरणाचा उलघडा झाला. पैसे घेण्यासाठी आलेल्या आरोपींना पोलिसांनी अटक केल्यावर या तरुणींची एक टोळी असून अशाच प्रकारे लोकांना आपल्या जाळ्यात ओढून लुटत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. अधिक तपासानंतर अशी अनेक प्रकरणं समोर येतील, असा पोलिसांचा अंदाज आहे.