MMRDA Recruitment 2019: मुंबई मेट्रो मध्ये 1053 जागांसाठी भरती, अशा पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज
Mumbai Metro (Photo Credits: ANI)

भारतात आलेल्या मंदीसदृश्य स्थितीचे भयाण वास्तव डोळ्यासमोर असताना सध्याच्या होतकरू तरुणांसाठी मेट्रोने एक आनंदाची बातमी आणली आहे. मुंबई मेट्रोमध्ये (Mumbai Metro) 1053 जागांसाठी भरती निघाली असून त्यासाठी 16 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. एमएमआरडीएच्या mmrda.maharashtra.gov.in अधिकृत संकेतस्थळावर या संबंधी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तसेच ही ऑनलाईन अर्ज भरण्याच्या संपुर्ण प्रक्रियेबद्दलही यात माहिती देण्यात आली आहे.

या 1053 जागांमध्ये स्टेशन मॅनेजर, स्टेशन नियंत्रक, विभाग अभियंता, कनिष्ठ अभियंता, मेट्रो नियंत्रक, ट्रॅफिक नियंत्रक, कनिष्ट अभियंता (S & T) यांसारख्या अनेक विभागांमध्ये ही जागा निघाल्या आहेत. येथे पाहा संपुर्ण यादी

MMRDA (Photo Credits: Twitter)

हेही वाचा- नाशिक मध्ये लवकरच सुरु होणार मेट्रो, राज्य मंत्रिमंडळात प्रकल्पाला मंजुरी

अर्ज कसा कराल:

ह्या लिंकवर क्लिक करुन तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता. मात्र ही लिंक 16 सप्टेंबरपासून सक्रिय होईल.

अर्जाची रक्कम:

MMRDA मध्ये ऑनलाईन अर्ज भरण्याची रक्कम खुल्या वर्गासाठी 300 रुपये तर आरक्षित वर्गासाठी 150 रुपये अशी आहे.

निवडण्याची प्रक्रिया:

MMRDA Recruitment 2019 मध्ये निवडीसाठी ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखत घेण्यात येईल. जो उमेदवार लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला असेल त्याला कागदपत्रांच्या पडताळणीसाठी आणि मुलाखतीसाठी बोलावले जाईल.