UP: युपीतील कुशीनर जनपदच्या पडरौना कोतवाली क्षेत्रात जरार गावात तांत्रिकाने भूत उतरवण्याच्या नावाखाली एका लहान मुलाचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षदर्शींनी असे म्हटले की, आजारी असल्याने मुलाची प्रकृती सुधरवण्याच्या नावाखाली तांत्रिकाने लहान मुलाला चप्पलेने मारले. ऐवढेच नाही तर मुलाच्या तोंडात सुद्धा चप्पल तांत्रिकाने घुसवली. यामुळे मुलाचा नाहक बळी गेला. एका बाजूला 4 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाच पण दुसऱ्या बाजूला उपचाराअभावी मुलीचा सुद्धा मृत्यू झाला. दोन्ही मुलांच्या मृत्यूमुळे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, 4 वर्षीय मुलाला काही दिवसांपासून ताप आणि उलट्या होत होत्या. नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी एका शिकावू डॉक्टरांकडे नेत होते. परंतु त्याच्या प्रकृतीत कोणतीच सुधारणा झाली नाही. मुलाची प्रकृती अधिक बिघडल्याने नातेवाईक अधिक त्रस्त झाले. त्यानंतर त्याची प्रकृती ठिक होण्यासाठी त्यांनी एका तांत्रिकाकडे नेले. त्याने मुलाच्या अंगात भूत असल्याचे सांगितले. पण जेथे खरंच डॉक्टरांकडे नेण्याची गरज होती तेथे नातेवाईकांनी त्याला तांत्रिकाकडे नेल्याने त्याचा मृत्यू झाला.(सोशल मीडियात युजर्सचा कोविड लस घेतलेली नसलेल्यांना, मृतांना देखील COVID-19 Vaccination Certificate दिल्याचा दावा)
निष्पाप मुलाच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी दोन महिलांना अटक केली तर तांत्रिक घटनास्थळावरून पळून गेला. पडरौना कोतवालचे प्रभारी निरीक्षक निर्भय सिंह यांनी सांगितले की, दोन महिलांना पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले आहे, आतापर्यंत पीडितेकडून कोणतीही तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यानंतर कारवाई केली जाईल. कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, निष्पाप मुलाला बरे करण्याच्या नावाखाली, तांत्रिकाने त्याला बराच वेळ जमिनीवर पडून ठेवले आणि मुलाला फिक्स करण्याच्या नावाखाली चेहऱ्यावर बूट घासले. एवढेच नाही तर तांत्रिकाने मुलाच्या तोंडाच्या आत एक बूटही घातला, त्यानंतर मुलाचा वेदनेने मृत्यू झाला.