PM Narendra Modi (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरससारखा महाभयाण विषाणू दिवसेंदिवस भारतात आपले स्थान आणखी मजबूत बनवत चालले आहे. COVID-19 च्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. यामुळे लोकांनी घराबाहेर पडता येत नाहीय. अशा परिस्थितीतही नागरिकांनी घराबाहेर न पडता आपले सण अगदी आनंदात आणि उत्साहात साजरा करून भारत सरकारला साथ दिल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशवासियांचे आभार मानले. तुमचे हे सामर्थ्य, ही एकजूट कोरोना विरुद्धचा लढा जिंकण्यासाठी ताकद मिळेल असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले.

या ट्विटमध्ये मोदींनी लोकांनी शिस्त तसेच नियमांचे पालन करुन आपले सण साजरा करून आपल्या परंपरा आणि रिती जपल्यामुळे त्यांचे कौतुक केले आहे. तसेच असा कठीण परिस्थितीत देशवासियांनी दाखविलेल्या हिंमतीचे देखील कौतुक केले आहे. Coronavirus: भारतात कोरोना बाधितांची एकूण संख्या 10,363 वर 339 रुग्णांचा मृत्यू

पाहा ट्विट:

जर लोकांनी अशीच आपली एकजूट आणि शक्ती दाखविली तर कोरोना विरुद्धचा लढा आपण नक्कीच जिंकू असा विश्वास देखील मोदींनी दाखविला आहे.

भारतात आज कोरोना बाधितांची एकूण संख्या ही 10,363 वर जाऊन पोहोचली आहे. यात 8988 सक्रिय केसेस, 1035 डिस्चार्ज मिळालेले रुग्ण तसेच 339 मृत्यू झालेल्या रुग्णांचा समावेश आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तसेच यात 1211 नवीन रुग्णांचा समावेश असल्याचे देखील सांगण्यात येत आहे