शिवसेना खासदार विनायक राऊत (Shiv Sena MP Vinayak Raut) लकसभेत आज आक्रमक पवित्र्यात दिसले. विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सडेतोड मत मांडत केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. जर जेवणासाठी सोन्याचे ताट समोर ठेवले परंतू, ते जर रिकामे असेल तर खायचे काय? असा सवाल उपस्थित करत 127 व्या घटना दुरुस्तीवर (127th Constitution Amendment Bill) चर्चा सुरु असताना विनय राऊत ( Vinayak Raut) लोकसभेत बोलत होते. या वेळी त्यांनी केंद्र सरकारच्या दिरंगाईमुळेच मराठा आरक्षण रखडल्याचा आरोपही त्यांनी केला.
केंद्र सरकारने 102 वी घटना दुरुस्ती केली. ही दुरुस्ती देशातील राज्यांना विकलांग करुन सत्ता केंद्रभूत करण्यासाठीच केली होती. हे प्रत्यक्षात मंत्री महोदयांनीही मान्य केले आहे. अखेर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दाखवून दिले की, 102 वी घटनादुरुस्ती म्हणजे देशातील आरक्षीत समाजावर झालेला अन्याय आहे. त्यात आता 105 वी घटना दुरुस्ती आणत केंद्र सरकारने त्यात दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला. ही दुरुस्ती म्हणजे 'आगीतून उठून फुफाट्यात पडणे'च आहे. 102 व्या घटना दुरुस्तीने उद्ध्वस्त त्यात आता दुसुस्ती करुन 105 वी घटना दुरुस्ती आणली जात आहे. परंतू, या घटनादुरुस्तीने तरी काय दिले? (हेही वाचा, Maratha Reservation: मराठा आरक्षण द्यायचे असेल तर केंद्र सरकारने आरक्षणाची 50 टक्के मर्यादाही शिथिल करावी- अशोक चव्हाण)
महाराष्ट्रात, मराठा, धनगर असे विविध समाज आहेत. राजस्थानामध्ये गुर्जर, हरयाणात जाट तर गुजरातमध्ये पटेल समाज आहे. या सर्व समाजाने केली आंदोलने आपण पाहिली आहेत. यातील बहुतांश समाजांनी आपली आंदोलने ही लाठ्या काठ्या घेऊन केली. परंतू, महाराष्ट्रातील मराठा, धनगर समाजाने अत्यंत अहिंसक पद्धतीने आंदोलने केली. ही आंदोलने केवळ शांत पद्धतीने सुरु होती. ही एक खऱ्या अर्थाने सामाजिक चळवळ होती. इतर समाजांनीही त्यांचा आदर केला, असेही विनायक राऊत लोकसभेत म्हणाले.