Man Kills Gay Partner: सेक्स करण्यासाठी टाकत होता दबाव; वृद्ध व्यक्तीने केली आपल्या 34 वर्षीय 'गे पार्टनर'ची हत्या
Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

गुजरातमधून (Gujarat) हत्येचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. सोमवारी पंचमहाल पोलिसांनी शेतातून एका तरुणाचा मृतदेह बाहेर काढला. या हत्येच्या आरोपावरून पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. हत्येतील आरोपी आणि मृत दोघेही गे-पार्टनर होते, म्हणजेच दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. आरोपीने आपल्या समलिंगी साथीदाराची हत्या करून मृतदेह शेतात पुरला होता. पोलिसांच्या चौकशीमध्ये आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे.

TOI च्या रिपोर्टनुसार, आरोपीचे नाव रणछोड राठवा असे आहे. माहितीनुसार, शारीरिक संबंधाच्या वादातून ही हत्या झाली आहे. मृतक त्याला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी नेहमी दबाव टाकत होता. यामुळेच त्रस्त झालेल्या रणछोडने आपल्या गे पार्टनरची हत्या केली. पोलिसांनी रविवारी रात्री आरोपीला अटक केली. पीडितेच्या फोनवर आलेल्या कॉलमुळे आरोपीला अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक आरोपीवर सेक्स करण्यासाठी दबाव टाकत होता. त्याला धमकावत होता व ब्लॅकमेलही करत होता. आरोपीने काही काळापूर्वी मयताच्या कुटुंबीयांशीही संपर्क साधून, त्यांना याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर मयत 8 जानेवारी रोजी घरून निघून गेला होता व तो परत आलाच नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. नातेवाइकांनी आरोपीशीही संपर्क साधला मात्र त्याने आपल्याला काहीच माहित नसल्याचे सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात मृतक हरवल्याची तक्रार दाखल केली. (हेही वाचा: Gujrat Shocker: टोमॅटो तोडण्यावरून झालेला वाद पोहोचला टोकाला, मोठ्या भावाची केली निर्घृण हत्या)

हलोल येथील रहिवासी असलेल्या आरोपीने आपल्यावर संशय येऊ नये म्हणून, अनेक दिवस मृतकाला शोधण्यासाठी पोलिसांना मदत केली. मात्र एका फोन कॉलवरून आरोपीला अटक केली गेली. आरोपीने पीडितेला पंचमहालच्या शेतात बोलावून कुऱ्हाडीने त्याच्यावर वार केले होते. हत्या केल्यानंतर वृद्धेने जवळच असलेल्या त्यांच्या शेतात दीड फूट खोल खड्डा खणून मृतदेह पुरला.