Arrest | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

दूर्ग पोलिसांनी एका व्यक्तस अटक केली आहे. हा व्यक्ती महादेव सट्टा ॲप (Mahadev Satta App) चालवत असल्याच्या त्याच्यावर आरोप आहे. विशेष म्हणजे हा व्यक्ती कारमधून हे ॲप चालवत असे. सट्टेबाजी रोखण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पोलिसांच्या एका पथकाने ही कारवाई केली. आरोपीस अटक केल्याने या व्यवहारात होणाऱ्या लाखो करोडो रुपयांच्या व्यवहारांची माहिती पोलिसांना मिळाली आहे. दूर्ग भिलाई पोलिसांनी कारवाई अधिक वेगवान केली असून या प्रकरणात आणखी काही लोक हाताला लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्राप्त माहितीनुसार, पोलिसांनी आरोपीकडन 5 एटीएम कार्ड आणि पाच सीम कार्ड जप्त केली आहेत. सत्यप्रकाश तिवारी नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी अशा प्रकारे सट्टा ॲप चालवत असल्याची गुप्त माहिती आम्हाला खबऱ्यांकडून मिळाली होती. त्यामुळे आम्ही पोलिसांचे एक पथक तयार केले आणि आरोपीस ताब्यात घेतले. हर्ष कुमार अशी आरोपीची प्राथमिक ओळख आहे. (हेही वाचा, Satta Matka to DpBOSS in India: भारतामध्ये कशी झाली सट्टा मटकाची सुरूवात? पहा त्याचा इतिहास)

आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याने पोलिसांना सांगितले की, तो विवेकानंद गार्डन जवळून ऑनलाईन गेमिंग ॲपच्या सहाय्याने सट्टेबाजी करत होता. तो ऑनलाईन गेमिंग सट्टा ॲप चालविण्यात माहित आहे. प्राथमिक चौकशीतच त्याने लाखो रुपयांचा हिशोब दिला आहे. त्याच्याकडून इतरही आणखी माहिती मिळण्याची शक्यता आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव सट्टा गेमिंग ॲप प्रकरणात आरोपीस झालेली अटक म्हणजे मोठी कारवाई आहे. या अटकेमुळे आणखी काही धागेदोरे हाती लागतील. पोलिसांनी आरोपी आणि त्यांच्या इतर साथिदारांबाबत चौकशी सुरु केली आहे. चौकशीमध्ये आणखी काही तपशील हाती येण्याची शक्यता आहे. आतापर्यंतच्या चौकशीत पोलिसांना सट्ट्याचा जो हिशोब मिळाला आहे तो जवळपास 6 लाख रुपयांहून अधिक आहे. आरोपीच्या इतर साथिदारांनाही पोलीस लवकरच ताब्यात घेतील, असे सांगितले जात आहे.