![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/08/Indian-parrot-380x214.jpg)
मध्य प्रदेश (Madhya Pradesh) राज्यातील दीपक सोनी नामक एका व्यक्तीचा पोपट हरवला (Parrot Goes Missing) आहे. या व्यक्तीची त्याने पाळलेल्या पोपटासोबत कथीतरित्या मैत्री होती. पोपट हरवल्याने हा व्यक्ती व्याकूळ झाला आहे. परिणामी त्याने शहरभर पोस्टर्स लावले आहेत. या पोस्टर्सवर लिहिलेल्या मजकूरामध्ये म्हटले आहे की, 'माझा पोपट कालपासून हरवला आहे. जो कोणी या पोपटाचा ठावठिकाणा देईल त्याला रोख 10,000 रुपयांचे बक्षीस देण्यात येईल.'
पोपटाच्या मालकाने केवळ शहरभर पोस्टर्सच लावले नाहीत तर, लोकाना पोपट आणि बक्षिसाची माहिती व्हावी यासाठी त्याने शहरातील रिक्षावाल्यांना पैसे देऊन जाहिरातही केली आहे. या व्यक्तीने म्हटले आहे की, पोपट काल रात्रीपासून बेपत्ता आहे. तो माझ्या संपूर्ण कुटुंबाला प्रिय होता. काल माझ्या वडिलांनी त्याला बाहेर काढला आणि तो उडून गेला. पोपटाला नीट उडता येत नसल्याने मी काळजीत आहे, असेही पोपट मालक दीपक सोनी यांनी म्हटले आहे. एनडीटीव्हीने याबाबत वृत्त दिले आहे.
सोनी यांनी पोपटाबद्दल माहिती देताना पुढे म्हटले आहे की, वक्राकार चोच आणि चमकदार रंगाची पिसे असलेला हिरवा पोपट मूळचा भारतीय पक्षी आहे. हा पक्षी दोन वर्षांपासून आणच्या कुटुंबासोबत राहतो. असे वाटते की ते कुठेतरी लपला आहे. काही भटके कुत्रे त्याच्यावर भुंकल्यामुळे तो घाबरला आणि उडून गेला. आम्ही सर्व अस्वस्थ आहोत, आम्ही पहाटे 2 वाजलेपासून पासून आमचा पक्षी शोधत आहोत. मी विनंती करत आहे की ज्या कोणाला ते सापडेल त्यांनी आम्हाला पोस्टरवर नमूद केलेल्या नंबरवर कॉल करा आणि आम्ही रोख 10,000 रुपयांचे बक्षीस देऊ.