Gas Cylinder Price: आजपासून म्हणजेच 1 नोव्हेंबरपासून तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर आता महागले आहेत. ताज्या दरांनुसार गॅस सिलिंडर साधारण 62 रुपयांनी महागले आहे. दरम्यान तेल कंपन्यांनी 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. व्यावसायिक कामासाठी वापरला जाणारा सिलिंडर सलग चौथ्या महिन्यात महागला आहे. तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरासोबतच विमानप्रवासात वापरल्या जाणाऱ्या ATF च्या किमतीतही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ऐन दिवळीच्या काळात ही दरवाढ झाल्याने आधीच महागाईच्या झळा सोसणाऱ्या सामान्य नागरिकांना यामुळे आणखी खिशाला झळ बसणार आहे. (हेही वाचा - Key Changes from November 1: एक नोव्हेंबरपासून महत्त्वाचे बदल; नवीन RBI DMT नियम, क्रेडिट कार्ड अपडेट्स, भारतीय रेल्वे तिकीट बुकिंग आणि बरेच काही )
दिल्ली - 1802 रुपये
कोलकाता - 1911.50 रुपये
मुंबई - 1754.50 रुपये
चेन्नई - 1964.50 रुपये
घरगुती गॅस सिलिंडरचे दर
दिल्ली - 803 रुपये
कोलकाता - 829 रुपये
मुंबई - 802.50 रुपये
चेन्नई - 818.50 रुपये
घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. मात्र व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढल्याने रेस्टॉरंटमधील जेवणाच्या किंमतीवर परिणाम होऊ शकतो आणि रेस्टॉरंट जेवणाचे दर वाढवू शकतात.दरम्यान तेल कंपन्यांनी विमानासाठी लागणाऱ्या इंधनाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 नोव्हेंबरपासून विमानाचे इंधन म्हणजेच ATF च्या किमतीत 3 हजार रुपये प्रति किलो या प्रमाणे वाढ केली आहे.