Kulbhushan Jadhav Case | File Image | (Photo Credits: PTI)

पाकिस्तानच्या तुरुंगात हेरगिरीच्या आरोपाखाली कैद असलेले भारतीय नौसेनेचे सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव (Kulbhushan Jadhav) यांनी रिव्ह्यू पीटिशन (Review Petition) दाखल करण्यास नकार दिला आहे. पाकिस्तानचे म्हणणे आहे की, त्यांनी कुलभूषण जाधव यांच्या समोर दुसरा कॉऊन्सलर एक्सेस देण्याची ऑफर दिली आहे. परंतु, कुलभूषण जाधव यांनी रिव्ह्यू पीटिशन फाईल करण्यास नकार दिला असल्याची माहिती Pak Addl Attorney General यांच्याकडून देण्यात आली आहे. पाकिस्तानच्या सुत्रांनुसार, पाकिस्तानने 17 जून रोजी कुलभूषण जाधव यांना रिव्ह्यू पीटीशन फाईल करण्यास सांगितले होते. परंतु, त्यांनी यासाठी नकार दिल्याची माहिती पाकिस्तानने दिली आहे.

एप्रिल 2017 मध्ये पाकिस्तानी सैन्य न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना हेरगिरी आणि दहशतवाद्याच्या आरोपाखाली मृत्यूची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात या सुनावणी विरुद्ध याचिका दाखल केली होती. त्यात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारताच्या बाजूने निर्णय दिला. (आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताच्या बाजुने लागलेल्या निकालावर ट्विट करत गिरीराज सिंह यांनी उडवली 'पाकिस्तान'ची खिल्ली)

ANI Tweet:

या प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला त्यांची शिक्षा कमी करण्याचा आणि लवकरात लवकर काऊन्सर अॅक्सेस देण्याचा आदेश दिला होता. तेव्हापासून भारत या निर्णयाची अंमलबजावणी होण्यासाठी पाकिस्तानशी चर्चा करत आहे. गेल्या वर्षी पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्याशी निगडीत कोणत्याही बाबतीत सामंजस्य करार करण्यास नकार दिला आहे. तसंच सप्टेंबर 2019 मध्ये पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना दुसरा कॉऊन्सलर एक्सेस देण्यास नकार दिला होता.