Kerala Blast: केऱळात फटाक्याच्या कारखान्यात मोठा स्फोट, एकाचा मृत्यू तर 16 जण जखमी

केरळमधील त्रिपुनिथुरा येथील रहिवाशी भागात फटाक्यांच्या फॅक्टरीमध्ये स्फोट झाल्याची घटना घडलीय. यात 16 जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. जखमींपैकी 4 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळील कलामासेरी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान फटाका फॅक्टरीत झालेला स्फोट इतका भीषण होता की, या फॅक्टरीच्या आसपासची 25 घरे जमिनदोस्त झालीत. मृत व्यक्तीची ओळख पटली असून त्याचे नाव विष्णू असून तो तिरुवनंतपुरम येथील राहणारा असल्याचं सांगितलं जात आहे.  ( Woman Tourist Falls To Death In Manali: पॅराग्लायडिंग करताना सेफ्टी बेल्ट उघडला, 250 मीटर उंचीवरून पडून महिलेचा मृत्यू; पायलटला अटक)

दरम्यान फॅक्टरीमध्ये स्फोट कशामुळे झाला याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. पोलीस आणि अग्रिशमन दलाची तुकडी घटनास्थळी दाखल झालीय. पोलिसांनी जखमी झालेल्या व्यक्तींना रुग्णालयात दाखल केलंय.

पाहा पोस्ट -

एका वाहनातून फटाके गोदामात उतरवले जात होते त्याचवेळी स्फोट झाला. कोणीतरी बिडी किंवा सिगारेट पीत असावं आणि त्याने जळती सिगारेट किंवा बि़डी तशीच फेकून दिली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. फटाका फॅक्टरीमध्ये झालेला स्फोट भीषण होता. स्फोटाचे धक्के अनेक किलोमीटरपर्यंत जाणवल्याची माहिती अग्मिमन दलाच्या अधिकाऱ्याने दिलीय. स्फोट झाल्यानंतर आगीने भडका घेतला होता, परंतु अग्निशमन दलाच्या जवानांनी आग शमवली आहे.