जयपूर (Jaipur) येथे काही अल्पवयीन मुलांनी बॉलिवूड स्टार शाहीद कपूर (Shahid Kapoor) याचा सध्या बॉक्स ऑफिसवर गाजत असलेला सिनेमा कबीर सिंह (Kabir Singh) पाहायचा होता. मात्र कबीर सिंह पाहण्यासाठी वयाची 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक असल्याची अट ठेवण्यात आली आहे. मात्र काही मुलांनी हा चित्रपट पाहण्यासाठी फारच अतिहुशारी केली. यासाठी चक्क त्या मुलांनी सिनेमागृहात प्रवेश मिळावा यासाठी खोटे आधार कार्ड दाखवले.
आयएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, आकाश (नाव बदलेले) याने आणि त्याच्या मित्राने आधार कार्डचा फोटो मोबाईलवर क्लिक केला. त्यानंतर एका मोबाईल अॅपच्या माध्यमातून त्यांनी जन्मदिनांक बदलली. कारण असे केल्याने कबीर सिंह पाहण्यासाठी जात असताना कोणीही अडवू नये म्हणून असा प्रकार केल्याचे मुलाने स्पष्ट केले आहे.
तसेच युवराज (नाव बदलेले) याने असे म्हटले आहे की, बुक माय शोच्या माध्यमातून कबीर सिंह चित्रपटाची काही तिकिटे आम्ही बुक केली. मात्र तेव्हा सुदैवाने कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र किंवा वय किती आहे हे दाखवले नाही. तसेच सिनेमागृहात प्रवेश मिळवण्यासाठी काय खटपट केली आहे हे सुद्धा शाळेतील एका मित्राने त्याच्या अन्य मित्रांना सांगितले होते. त्याचसोबत मोबाईलवर खोट्या आधार कार्डचा फोटो क्लिक करुन घेण्यास सांगितले होते.(गोरखपूर: TikTok व्हिडिओ बनवण्यासाठी दोन तरुणांची पूलावरुन उडी, एकजण बेपत्ता)
या घटनेबद्दल बुक माय शो यांनी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरुन असे सांगितले होते की, A-ग्रेड चित्रपट असल्याने 18 वर्षाच्या खालील मुलांना हा चित्रपट पाहण्यास बंदी आहे. तरीही लोक या गोष्टीकडे दुर्लक्ष करत तिकिट बुक करत आहेत. मात्र सिनेमागृहात प्रवेश करताना ओळपत्र दाखवणे जरुरीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.