काँग्रेसचे जेष्ठ नेते राजनारायण गर्ग यांचे रस्ता अपघात मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना उत्तर प्रदेश येथील चित्रकूट जिल्ह्यातील कस्बे परिसरात आज मंगळवारी सायंकाळी घडली. 

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. > पीएचडीधारक अधिव्याख्यात्यांना 1996 पासून दोन वेतनवाढी> रसायन तंत्रज्ञान संस्था, तंत्रशास्त्र विद्यापीठातील शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाची सुधारित वेतनश्रेणी> पुणे येथे अध्यापकांसाठी कंपनी कायद्यान्वये प्रशिक्षण संस्था> सरपंचाची निवड आता पूर्वीप्रमाणेच सदस्यांमधून होणार> तंत्रश‍िक्षण संचालनालयाच्या संस्थांमधील श‍िक्षकीय, समकक्ष पदांना सातवा वेतन आयोग

27 मार्च रोजी 100 व्या नाट्यसंमेलनाचे उद्घाटन सांगली येथे होणार आहे. 27 मार्च हा दिवस जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांची निवड झाली आहे.   

एअर इंडियाः एआय 348 / 349- मुंबई- दिल्ली- शांघाय विमान उड्डाण 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान रद्द करण्यात आली आहे. देशात पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या भीतीने हा निर्णय घेण्यात आला आहे.  

मुंबईमध्ये दरवर्षी LGBTQ समुदायाचा Queer Azadi March आयोजित केला जातो. या समुदायासाठी काम करणारी संस्था हमसफर ट्रस्ट हा मार्च आयोजित करते. मात्र यावर्षी CAA-NRC या मुद्द्याला LGBTQ March शी जोडण्यात आल्याने यंदाची परेड रद्द करण्यात आली आहे. 

दिल्ली पोलिसांनी आज  जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात CAA विरोधात आंदोलन करणार्‍या 70 जणांचे फोटो रिलीज केले आहेत. 15 डिसेंबर 2019 दिवशी विद्यार्थ्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात निषेध केला होता.

आज बहुजन क्रांती मोर्चाच्या भारत बंदला हिंसक वळण लागलं. काही काळ पोलिस आणि आंदोलकांना संघर्षाचं वातावरण  निर्माण झालं होतं.  

पुणे शहरामध्ये आज CAA, NRC ला विरोध करणारे सुमारे 250 आंदोलक पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने काही प्राथमिक उपाय सूचवले आहेत. या उपायांबाबत माहिती देणारे एक ट्विट केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केले आहे.ट्विट

आपली मुंबई स्वच्छ मुंबई असे म्हणत मुंबई महापालिकेने स्वच्छता सर्वेक्षणात मतदान करण्याचे अवाहन नागरिकांना केले आहे. त्यासाठी एक खास ट्विट करत पालविकेने आपल्या ट्वटर हँडलवर मलम्मा नावाच्या एका 54 वर्षीय महिलेचा फोटोही ट्विट केल आहे. तसेच #SwachhSurvekshan2020Mumbai #MumbaiVijayiAamhiVijayi हे खास हॅशटॅगही वापरले आहेत.ट्विट

Load More

नागरिकत्त्व दुरूस्ती कायदा, एनआरसी आणि ईव्हीएमच्या विरोधात आज (29 जानेवारी) बहुजन क्रांती मोर्चा कडून भारत बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान या बंदच्या पार्श्वभूमीवर अद्याप वाहतूक किंवा इतर व्यवस्थेवर कोणत्याही परिणाम मुंबई सह महाराष्ट्रात आढळून आलेला नाही मात्र पोलिसांकडून चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. देशभरात सध्या सीएए आणि एनआरसीला विरोध होत आहे. त्यामुळे या कायद्याच्या विरोधात असणार्‍या संघटनांचा बहुजन क्रांती मोर्चाला पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.

राज्यात परळी व्यापारी संघटनेने आम्ही बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचं सांगितलं आहे. दरम्यान मागील महिन्याभरात सतत बंद होत असल्याने त्याचा आर्थिक फटका व्यापारांना होत आहे त्यामुळे आजच्या भारत बंदमध्ये सहभागी न झाल्याचं सांगण्यात आले आहे. मुंबईत कांजूरमार्ग स्थानकाजवळ बहुजन क्रांती मोर्चाचा रेल रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला असून दरम्यान काही काळ वाहतूक विस्कळीत करण्याचा प्रयत्न झाला होता.

आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या

दरम्यान भारत बंद मध्येही सहभागी होण्यासाठी बहुजन क्रांती मोर्च्याच्या  कार्यकर्त्यांना मारहाण झाली आहे.  शिवाजी चौकामध्ये हॉकी स्टिक आणि रॉडने मारहाण झाली आहे.