प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. एकता कपूर, कंगना रनौत, अदनान सामी सोबत 118 व्यक्तींना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. मात्र आता मनसेने अदनान सामी यांच्या पद्मश्रीला विरोध केला आहे. ते 'मूळ भारतीय नागरिक' नाहीत असे म्हणत मनसेकडून हा विरोध केला जात आहे.  

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पुन्हा एकदा खात्यांची अदलाबदली झाली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे आता आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन खातेदेखील सोपवण्यात आले आहे. यापूर्वी ही दोन्ही खाती संजय राठोड यांच्याकडे होती. संजय राठोड यांच्याकडे विजय वडेट्टीवार यांच्याकडे असलेले भूकंप पुनर्वसन खाते सोपवण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिफारसीनंतर राज्यपालांनी हा बदल मान्य केला आहे. 

प्रजासत्ताक दिनानिमित्त पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले, त्यानंतर आता पद्मविभूषणचीही घोषणा करण्यात आली आहे. यावेळी सात व्यक्तींना पद्म विभूषण पुरस्काराने गौरविण्यात येईल. पद्मविभूषणने सन्मानित झालेल्यांमध्ये माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांचा समावेश आहे. या दोघांनाही मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्कार मिळाला आहे.

नवी दिल्ली येथील भजनपुरा परिसरातील एक इमारत कोसळली असून यात  3 विद्यार्थ्यांसह एका शिक्षकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.  तसेच ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत 13 जणांना वाचवण्यात यश आले असून त्यांना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी अग्निशमनदलाच्या गाड्या दाखल झाल्या असून बचाबकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.एएनआयचे ट्वीट-

 

भंडारा जिल्ह्यातील बिनाखी शिवारात वाघाने हल्ला केत्यामुळे 3 व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत. गावात वाघ शिरल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी एका ठिकाणी जमाव केला. दरम्यान, वाघाने ग्रामस्थांवर हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ प्रचंड वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत वाघ एका व्यक्तीच्या अंगावर बसलेला दिसत आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे.एएनआयचे ट्वीट- 

 

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राष्ट्रपती पोलीस पदके जाहीर करण्यात आले असून 1040 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यात समावेश आहे. याशिवाय महाराष्ट्रातील 54 पोलिसांचा यात समावेश आहे. यात 4 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती वरिष्ठ सेवा पदके मिळाले आहे. तसेच 10 पोलिस अधिकाऱ्यांना शौर्य पदके जाहीर करण्यात आले तर, 40 पोलीस अधिकाऱ्यांना गुणवत्ता सेवा पदके देण्यात आली आहेत

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचा तपास केंद्र सरकारने NIA कडे सोपविल्यानंतर विरोधकांकडून केंद्र सरकारवर टीका होण्यास सुरुवात झाली. यावर कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. “एनआयएमार्फत तपास करायचा होता तर आधीच करायचा होता. मात्र, या प्रकरणी राज्य सरकारनं काही भूमिका घेतली त्यानंतर केंद्रानं आपली भूमिका बदलली,” असं वळसे-पाटील यावेळी म्हणाले. 

मराठी आणि हिंदीतील प्रसिद्ध ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळाल्याने आपण फार आनंदी आहोत अशी प्रतिक्रिया वाडकरांनी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.  

मनसे पक्षाची आणि पक्षप्रमुख राज ठाकरे यांची बदलती भूमिका पाहून अनेक राजकीय पक्षांनी त्यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. लोकसभा निवडणूकीवेळी राज ठाकरेंवर झालेली ईडीची भूमिका पाहता राज ठाकरेंनी आपली भूमिका बदलली असावी असा खोचक टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. 

भीमा कोरेगाव प्रकरणी  एल्गार परिषदसंदर्भातील पुढील तपास राष्ट्रीय तपास यंत्रणाकडे सोपण्यात आले आहे. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एनआयच्या चौकशीवर आक्षेप नोंदवला होता.  यातच शरद पावर यांच्या वक्तव्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. एनआयएच्या चौकशीत राष्ट्रवादीचे नेतेच एक्सपोज होतील, असे विधान सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. 

Load More

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) 23 जानेवारीला झालेले राज्यव्यापी अधिवेशनाने मनसे पक्षाच्या भविष्यातील वाटचाल कशी असेल याबाबत भूमिका स्पष्ट झाली. मनसेचा नवा झेंडा आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी स्विकारलेली हिंदुत्वाची भूमिका हे जनतेप्रमाणे अन्य राजकीय पक्षांना देखील नवीन होते. या हिंदुत्वाच्या भूमिकेच्या खरपूस समाचार घेत शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला आहे. 'वीर सावरकर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे हिंदुत्व पेलणे हा काही येरागबाळ्यांचा खेळ नाही' अशा शब्दांत त्यांनी मनसे वर टीका केली आहे.

तर दुसरीकडे कोरेगाव भीमा प्रकरणातील सत्य बाहेर येऊ नये आणि ख-या गुन्हेगारांना संरक्षण मिळावे यासाठी NIA कडे पुढील तपास देणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले आहे.

आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या

एकूणच आज दिवसभरात कोरेगाव भीमा प्रकरणाबाबत आणखी काय नवीन धागेदोरे सापडतात, तसेच मनसेच्या नव्या भूमिकेबाबत अजून कोणकोणत्या पक्षाकडून टीका होईल किंवा कोणाकडून या भूमिकेचे स्वागत होईल ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.