Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
ताज्या बातम्या
5 hours ago

'शिवभोजन' थाळी योजनेसाठी शासनाकडून 6.48 कोटी रुपयांचे अनुदान; 23 जानेवारी 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या Siddhi Shinde | Jan 23, 2020 11:36 PM IST
A+
A-
23 Jan, 23:36 (IST)

'शिवभोजन थाळी' योजनेची अंमलबजावणी राज्यात 26 जानेवारी 2020 पासून होत आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी 'शिवभोजन' केंद्रे सुरू होणार आहेत. या योजनेसाठी शासनाने चालू वित्तीय वर्षात, उर्वरित तिमाहीसाठी 6.48 कोटी रुपयांची रक्कम अनुदान म्हणून उपलब्ध करून दिली आहे

23 Jan, 22:52 (IST)

ग्लोबल करप्शन परसेप्शन इंडेक्स 2019 मध्ये भारताचे स्थान घसरले आहे. भारत मागच्यावर्षी 78 व्या स्थानावर होता, आता यंदा भारताचे स्थान 80 आहे. याचाच अर्थ मोदी सरकारच्या काळात भारतामधील भ्रष्टाचार वाढला आहे. 

23 Jan, 22:05 (IST)

'ही माझी वचनपूर्ती नाही, तर त्या दिशेला टाकलेले पहिले पाऊल आहे. भाजपने ज्या प्रकारे आमच्याशी खोटेपणा केला, त्यानंतर विरोधकांशी मी हातमिळवणी केली मात्र अजूनही आमचा भगवा रंग बदलला नाही, आम्ही हिंदुत्व सोडले नाही.' - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

23 Jan, 21:54 (IST)

बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 मध्ये शिवसेनेची स्थापना केली होती. त्यावेळी बाळासाहेबांबरोबर काम केलेल्या 11 ज्येष्ठ शिवसैनिकाच्या हस्ते, आज उद्धव ठाकरे यांचा सत्कार केला गेला, तसेच रश्मी ठाकरे यांची ओटी भरली गेली. 

23 Jan, 21:22 (IST)

मा. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंना शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल असे वचन दिले होते. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन व स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. याच वचनाची झालेली पूर्ती साजरी करण्यासाठी शिवसेनचा वचनपूर्ती सोहळा आयोजित केला आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या सत्काराने या सोहळ्याला सुरुवात झाली आहे. 

23 Jan, 20:55 (IST)

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी गुरुवारी (23 जानेवारी) ब्रिटीश सरकारच्या ब्रेक्सिट कायद्यास मान्यता दिली. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ब्रसेल्समध्ये जॉन्सन यांनी ब्रिटनने युरोपियन युनियनमधून माघार घेण्याबाबतचे विधेयक मंजूर केले. हे विधेयक 31 जानेवारीपर्यंत कायद्यात रुपांतरीत होईल.

23 Jan, 19:53 (IST)

इंग्लंड, अमेरिकेहून एखादा नागरिक भारतात आला तर त्याला विचारले जाते बाबारे इथे का आला आहेस? पण, बांग्लादेशी, पाकिस्तानी मुस्लिमांना असे विचारले जात नाही. त्यांना परत पाठवण्याचे  काम केंद्र सरकार करत असेल , बांग्लादेशी, पाकिस्तानी मुसलमान हाकलून देण्यासाठी मनसे केंद्र सरकारला मदत करेन, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

23 Jan, 19:47 (IST)

मी माणूसघाणा व्यक्ती नाही. विरोधाला विरोध करत नाही. रंग तर कधीच बदलत नाही. सत्तेमध्ये जाण्यासाठी  कधीही रंग बदलणार नाही, असे म्हणत राज ठाकरे यांनी शिवसेनेला टोला लगावला

23 Jan, 19:43 (IST)

केवळ अडीच हजार रुपयांत बांग्लादेशी नागरिक भारतात येतात. उद्या जेव्हा काही घडेल तेव्हा भारताच्या सैनिकांना भारताबाहेर नव्हे भारतातच लढावे लागेल. खरे म्हणजे पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध तोडून टाकायला हवे आहेत. पहिली ती समझोता एक्सप्रेस बससेवा बंद करायला हवी-राज ठाकरे

23 Jan, 19:38 (IST)

भाषा ही कोणत्याही धर्माची नसते ती प्रदेशाची असते. असे नसते तर बंगाली भाषेचा आग्रह धरत बांग्लादेशी नागरिकांनी बंगाली भाषेचा आग्रह का धरला असता, असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे.

Load More

आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्वाचा ठरणार आहे, राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या बहुप्रतीक्षित मनसे महाधिवशेनात (MNS Maha Adhiveshan) येत्या काळासाठी पक्षाची भूमिका स्पष्ट केली जाईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आज, गुरुवारी गोरेगाव (Goregaon) येथे महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्यातील बदलत्या राजकीय घडामोंडीवर भाष्य करतानाच पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण करणार आहेत. मागील काही दिवसांपासून मनसेचा झेंडा भगव्या रंगात बदलून झेंड्यावर सोनेरी रंगाच्या षटकोनात राजमुद्रेप्रमाणे महाराष्ट्र धर्म लिहिले असेल अशी चर्चा आहे. ही भूमिका घेऊन पक्ष आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जनतेला साद घालणार असल्याचे म्हंटले जात होते, मात्र यात कितपत तथ्य आहे हे जाणून घेण्यासाठी आजच्या अधिवेशनाची वाट पाहावी लागणार आहे.

आज, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. यानिमित्त आज सकाळ पासूनच मुंबईतील शिवतीर्थावर गर्दी पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या वतीने हे औचित्य साधून वांद्रे कुर्ला संकुल येथील MMRDA मध्ये वाचपुरती जल्लोष सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये पहिल्या फळीच्या ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार केला जाणार आहे. दुसरीकडे, आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची देखील 123वी जयंती आहे, यानिमित्ताने आज सकाळपासून अनेक राजकीय मंडळींनी ट्विटरच्या माध्यमातून नेताजींना अभिवादन केले आहे.

आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या

दरम्यान, आज दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारासाठी गृहमंत्री अमित शाह यांच्या दोन सभा दिल्लीत पार पडणार आहेत. तर सर्वोच्च न्यायालयात जम्मू काश्मीर मधून कलम 370 हटवण्याच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी होणार आहे.


Show Full Article Share Now