Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

पुंछ येथे जम्मूसाठी निघालेल्या एका प्रवासी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. नौशेरा येथून 180 किमी दुर लंबेडीच्या ठिकाणी बस दरीत कोसळल्याने 7 जणांचा मृत्यू आणि 15 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस आणि स्थानिक नागरिकांकडून बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. जखमी आणि मृत झालेल्यांना दरीतून वरती काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. सुत्रांच्या मते जखमी झालेल्या रुग्णांना सुंदरबनी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, प्रवाशांची बस लंबेडी येथून निघाली असता अचानक गाडीवरील ताबा सुटल्याने ती दरीत कोसळली. बसमध्ये 30 पेक्षा अधिक लोक असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांकडून आणि स्थानिकांकडून दरीत कोसळलेली बस बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची प्रकृती अधिक गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच अद्याप बचाव कार्य सुरु असल्याची माहिती देण्यात येत आहे.

ANI Tweet:

तर काही दिवसांपूर्वी इजिप्तमध्ये पर्यटकांच्या बसला अपघात  झाला आहे. या अपघातात भारतीय पर्यटकांसह 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 24 पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 2 मलेशियन महिला, 1 भारतीय पर्यटक आणि इजिप्तमधील 3 नागरिकांचा समावेश आहे. या पर्यटन बसमध्ये 16 भारतीयांचा समावेश होता. भारतीय दूतावासाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे