Jammu-Kashmir: सुरक्षाबलाच्या जवानांना मोठे यश, अनंतनाग जिल्ह्यात लष्कर-ए-तैयबाच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा
Indian Army (Photo Credits-ANI)

Jammu-Kashmir: जम्मू-कश्मीर मधील अनंताग जिल्ह्यात शनिवारी सुरक्षाबलाच्या जवानांना मोठे यश मिळाले आहे. त्यानुसार त्यांनी लष्कर-ए-तैयबाच्या 3 दहशतवादांता खात्मा करण्यात आला आहे. या संबंधित एका पोलीस अधिकाऱ्यांनी असे म्हटले आहे की, सुरक्षाबलाकडून रानीपोरा परिसरात क्वारीकाम मध्ये दहशतवादी असल्याची सुचना मिळाली. त्यानंतर परिसराला घेराव घालण्यात आला आणि त्यांचा तपास सुरु केला. जेव्हा सुरक्षाबलाच्या जवानांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांच्यावर दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरु केला.

पोलीस अधिकाऱ्यांनी पुढे असे म्हटले की, सुरक्षाबलाच्या जवानांनी सुद्धा त्यांना सडेतोड उत्तर दिले. त्यावेळी दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरु झाला. या दरम्यान तीन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. आयजीपी कश्मीर विजय कुमार यांनी म्हटले की, अनंताग मध्ये गोळीबारादरम्यान लष्कर-ए-तैयबाचे तीन स्थानिक दहशतवादी मारले गेसे. ठार मारण्यात आलेला दहशतवादी आरिफ हाजम 6 जून 2019 रोजी 162 टीएच्या सेना हवलदार मंजूर बेग याच्या हत्येत सामिल होता. त्यावेळी बेग सुट्टीवर होते.(Jammu And Kashmir: श्रीनगरमध्ये ड्रोन वापरावर बंदी, वापरकर्त्यांना Drone पोलीस स्टेशनमध्ये जमाकरण्याचे आदेश)

Tweet:

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कुलगाम जिल्ह्यात सुरक्षाबलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला होता. दहशतवाद्यांबद्दल गुप्तहेराकडून माहिती मिळाली असता कुलगाम जिल्ह्यातील रेडवानी परिसराला घेराव घातला गेला. त्यानंतर त्यांचा शोध सुरु केला असता दोघांमध्ये गोळीबार सुरु झाला. दक्षिण कश्मीर मध्ये गेल्या तीन दिवसात पाच वेळा गोळीबार झाला. त्यामध्ये सात दहशतवादी ठार झाले आहेत.