Indian Army | (File photo)

Jammu-Kashmir:  भारतीय जवानांनी जम्मू-कश्मीर मधील उरी येथे पाकिस्तानचा कट उधळून लावला आहे. तर 2016 मध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राइकच्या वर्धापनादिनाच्या आधी पाकिस्ताच्या काही दहशतवाद्यांनी घुसघोरी सुरु करण्याचा प्रयत्न सुरु होता. मात्र यावर आता जवानांनी मोठी कारवाई केली आहे. त्याचसोबत भारतीय सेनेने लष्कर-ए-तैयबा यांच्या एका दहशतवाद्याला जीवंत ताब्यात घेतले आहे.(Jammu Kashmir Update: जम्मू -काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न सैनिकांनी हाणून पाडला, 3 जवान जखमी)

सेनेच्या अधिकाऱ्यांद्वारे मंगळवारी दुपारी या संपूर्ण ऑपरेशनची माहिती देण्यात आली आहे. हे ऑपरेशन 18-19 सप्टेंबर रोजी पार पाडण्यात आले होते. त्यावेळी गस्त घालत असताना जवानांनी बॉर्डरवर पाकिस्तानकडून घुसखोरी केली जात असल्याचे पाहिले होते.

गेल्या सात दिवसात 7 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. मात्र ज्या दहशतवाद्याला ताब्यात घेण्यात आले आहे त्याचे वय अवघे 19 वर्ष आहे. याचे नाव अली बाबर असून तो लष्कर-ए-तैयबा यांच्यासाठी काम करतो. अली बाबर याने सातवी पर्यंत शिक्षण घेतले आहे. ऐवढ्या कमी वयात त्याने दहशतवादाचा मार्ग स्विकारत थेट भारतात ऑपरेशन करण्यासाठी आला.

Tweet:

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, 25 सप्टेंबरला ऑपरेशनच्या दरम्यान पाकिस्तानी दहशतवादी अतीक उर रहमान याला ठार मारण्यात आले. त्यानंतर अली बाबर याने स्वत: आत्मसमर्पण केले. यानेच माहिती दिली की, हे सर्व 6 दहशतवादी पाकिस्तानातील पंजाब मध्ये राहणारे होते.(Jammu-Kashmir News: जम्मू-काश्मीरमधील काशवा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश)

अली बाबर हा वडिलांच्या मृत्युनंतर लष्कर मध्ये सामील झाला होता. त्याच्या घरी आई आणि बहिण आहे. 2019 मध्ये अली बाबरने पख्तनूवा मध्ये ट्रेनिंग घेतली होती. अली बाबरने सांगितले की, अतीक उर रहमान याने त्याच्या आईच्या उपचारासाठी 20 हजार रुपये देईन असे म्हटले होते. खरंतर त्याला 30 रुपये द्यायचे होते.