जम्मू काश्मिर येथे जवानांची मोठी कामगिरी: गोळीबारात 3 दहशतवाद्यांचा खात्मा, शोधमोहिम सुरु
Indian Army (Photo Credits-PTI)

जम्मू काश्मिर (Jammu-Kashmir) मधील पुलवामा (Pulwama) जिल्ह्यात रविवारी जवानांनी सुरु असलेल्या गोळीबारात मोठी कामगिरी केली आहे. तसेच तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात दहशतवाद्यांना यश आले आहे. तर स्थानिक भागात शोधमोहिम सुरु करण्यात आली आहे. शोधमोहिमे दरम्यान AK-47 बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत. एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, दहशतवाद्यांचे एक गुप्त ठिकाण उद्ध्वस्त करुन लावले आहे. परंतु अद्याप ही जवानांकडून शोधमोहिम सुरु आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण काश्मिर येथील त्राल मधील पिंगलिश गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती गुप्त सुत्रांकडून मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा रक्षक यंत्रणेने या ठिकाणाला घेराव घालून शोधमोहिम सुरु केली. तसेच शोधमोहिम सुरु केल्यानंतर दहशतवाद्यांकडून जवानांवर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर जवानांनी दहशतवाद्यांच्या गोळीबाराला प्रतिउत्तर देत 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

दरम्यान 2019 या वर्षाचे तीन महिने सुद्धा पूर्ण झाले नाहीत आणि जम्मू- काश्मिर येथील शहीद जवानांचा आकडा 55 पेक्षा अधिक झाला आहे. पुलवामा येथे 14 फेब्रुवारी झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर सीआरपीएफ चे 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर पाच जवान आणि आठ अन्य सुरक्षा रक्षक शहीद झाले.