
Pahalgam Terror Attack: दक्षिण काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) सरकार कृतीत उतरले आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानवर अनेक मोठे निर्बंध लादले आहेत. या घटनेपासून, भारताला जगभरातून पाठिंबा मिळत आहे. याच अनुषंगाने आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Israeli PM Benjamin Netanyahu) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी (PM Narendra Modi) फोनवरून चर्चा केली आहे.
पीडितांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभे आहोत - नेतन्याहू
यासंदर्भात माहिती देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून भारतीय भूमीवरील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. त्यांनी भारतातील लोक आणि पीडितांच्या कुटुंबियांसोबत एकता व्यक्त केली. पंतप्रधान मोदींनी सीमेपलीकडून झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या क्रूर स्वरूपाची माहिती दिली आणि गुन्हेगारांना आणि त्यांच्या समर्थकांना न्याय मिळवून देण्याचा भारताचा निर्धार व्यक्त केला. (हेही वाचा - Pahalgam Terror Attack: भारताच्या कृतीने पाकिस्तान संतप्त! हवाई क्षेत्र बंद करत शिमला करार रद्द करण्याची दिली धमकी)
दरम्यान, 22 एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्यानंतर जगभरातील देश भारतासोबत उभे आहेत. तसेच अनेक देश दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करत आहेत. तथापि, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह जगभरातील अनेक राष्ट्रप्रमुखांनी पंतप्रधान मोदींशी फोनवरून बोलून दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. (हेही वाचा -Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील हल्लेखोरांची माहिती देणार्यांना 20 लाखांचे बक्षीस जाहीर)
पहलगाम हल्ल्यात 26 दहशतवाद्यांचा मृत्यू -
मंगळवारी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक जण जखमी आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये बहुतेक पर्यटकांचा समावेश होता. या हल्ल्यानंतर जगभरातील देशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.