Indian Railways | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

भारतीय रेल्वेने आर्थिक वर्ष 2022-23 साठी 2.40 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी महसूल संकलनाची नोंद केली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत ही वाढ सुमारे 49000 कोटी रुपयांनी अधिक आहे, जी 25% वाढ दर्शवते. 2022-23 या आर्थिक वर्षात माल वाहतुकीतून मिळणाऱ्या महसुलात मोठी वाढ होत तो 1.62 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ अंदाजे 15% आहे. भारतीय रेल्वेच्या प्रवासी वाहतुक महसुलात देखील आतापर्यंतची सर्वाधिक 61% वाढ झाली असून ती 63,300 कोटी रुपये झाली. भारतीय रेल्वे तीन वर्षांच्या कालखंडानंतर निवृत्ती वेतनासाठीचा खर्च पूर्णपणे करण्यास सक्षम झाली आहे.

भारतीय रेल्वे नेहमीच सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देते. राष्ट्रीय रेल संरक्षा कोष अंतर्गत विविध सुरक्षा कामांसाठी आर्थिक वर्ष 2023 मध्ये 11,800 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.