श्रमिक आणि 15 स्पेशल ट्रेन वगळता 30 जून पर्यंत बूक केलेल्या रेल्वे तिकीट रद्द; रिफंड मिळणार
Indian Railways. Representational Image (Photo Credits: Youtube)

भारतीय रेल्वेने 30 जून पर्यंत बूक केलेली प्रवासी तिकीटं आता रद्द करून त्याची रिफंड प्रवाशांना दिली जातील असं स्पष्ट केलं आहे. मात्र या काळामध्ये रेल्वे मंत्रालयाकडून सुरू असलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी श्रमिक स्पेशल ट्रेन्स आणि 15 स्पेशल ट्रेन्स सुरू राहणार आहेत. सध्या कोरोना व्हायरस संकट काळात देशाच्या विविध कानाकोपर्‍यात अडकलेल्या स्थलांतरित मजुरासाठी श्रमिक स्पेशल ट्रेनने लाखो मजुरांना घरी पोहचवलं जात आहे. दरम्यान पुढील आदेशापर्यंत भारतामध्ये सार्‍या रेल्वे वाहतूक सेवा ज्यामध्ये लोकल, मेल, एक्सप्रेसच्या प्रवासी वाहतूकीचा समावेश होतो त्या बंद ठेवल्या जातील असं सांगितलं आहे.

दरम्यान बुधवार, 13 मे दिवशी जारी करण्यात आलेल्या नव्या गाईडलाईननुसार आता रेल्वे तिकीटांच्या रद्द केलेल्या तिकीटांची सुधारित गाईडलाईन जारी केल्या आहेत. जर रेल्वे मंत्रालयाकडून ट्रेन रद्द झाली तर त्याचं ऑटो रिफंड ई तिकीट साठी मिळेल. भारतामध्ये 24 मार्च पासुन रेल्वेची प्रवासी वाहतूक ठप्प आहे. तिकीट बुकींग कॅन्सलेशन, रिफंड संदर्भात भारतीय रेल्वेने जारी केली नवी नियमावली इथे वाचा सविस्तर  

ANI Tweet

दरम्यान भारतामध्ये कोरोना व्हायरसच्या रूग्णांमध्ये दिवसागणिक वाढ होणार आहे. आज भारतामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 78 हजारांच्या पार गेला आहे. मागील 24 तासामध्ये कोरोनाबाधितांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सुमारे 3722 नव्या रूग्णांसोबतच 134 जणांचा बळी गेला आहे.